मुंबई, १४ ऑगस्ट २०२५: लिव्हप्युअर या भारतातील ग्राहकांच्या स्वास्थ्याप्रती समर्पित आघाडीच्या व सर्वात विश्वसनीय ग्राहक-केंद्रित ब्रँडने गुरगाव, हरियाणामध्ये पहिले एक्सक्लुसिव्ह ब्रँड आऊटलेट व एक्स्पेरिअन्स सेंटर लाँच केले आहे. या केंद्रामध्ये सर्वोत्तम, प्रायोगिक स्वरूपात एकाच छताखाली लिव्हप्युअरच्या परिपूर्ण उत्पादन परिसंस्थेचा (वॉटर प्युरिफायर्स, किचन अप्लायन्सेस, एअर कूलर्स व स्लीप सोल्यूशन्स) समावेश आहे. आपल्या रिटेल धोरणाचा भाग म्हणून कंपनीची या आर्थिक वर्षामध्ये ४० आणखी स्टोअर्स सुरू करण्याची योजना आहे.
येथे भेट देणा-या व्यक्ती उत्पादनांबाबत माहिती जाणून घेऊ शकतात, त्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊ शकतात, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहू शकतात आणि त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिक मार्गदर्शन मिळवू शकतात. यामागे घर व स्वास्थ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निवड करणाऱ्या ग्राहकांना अधिक सुस्पष्टता, आत्मविश्वास व सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे. या दृष्टिकोनाला अधिक दृढ करत ब्रँड आता सप्टेंबरपर्यंत लखनौ, पानीपत व अमृतसर येथे नवीन स्टोअर्स लाँच करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढेल आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्हणाले, ”आम्हाला माहित आहे की, योग्य वेलनेस किंवा होम अप्लायन्स उत्पादनाची निवड करणे कुटुंबांसाठी मोठा निर्णय असू शकतो. आमचे एक्स्पेरिअन्स सेंटर त्या प्रक्रियेला सोपी, सुस्पष्ट आणि अधिक वैयक्तिक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे ग्राहक प्रत्यक्ष आमची कृतीशील नाविन्यता पाहू शकतात, प्रश्नं विचारू शकतात आणि त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार मार्गदर्शन मिळवू शकतात. हे शोरूमपेक्षा अधिक आहे, ज्यामधून आमची मुलभूत तत्त्वे नाविन्यता, विश्वास व ग्राहक स्वास्थ्य दिसून येते. आम्हाला या केंद्राची सुविधा देण्याचा अभिमान वाटतो, जेथे व्यक्ती आमचे सोल्यूशन्स जाणून घेऊ शकतात आणि आरोग्यदायी पाणी, शुद्ध हवा व सर्वोत्तम झोपेच्या प्रभावाचा अनुभव घेऊ शकतात. हे लाँच भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी स्मार्ट, अधिक आरोग्याप्रती जागरूक घर निर्माण करण्याप्रती आमच्या मिशनमधील अर्थपूर्ण पाऊल आहे.”
एक्स्पेरिअन्स सेंटरमध्ये लिव्हप्युअरची तंत्रज्ञान व शाश्वताप्रती कटिबद्धता पाहायला मिळते. लाइव्ह डेमो फॉर्मेटमध्ये एआय व आयओटीद्वारे समर्थित प्रगत वैशिष्ट्यांचा अनुभव मिळतो, ज्यामध्ये स्मार्ट सोल्यूशन्स आरोग्यदायी राहणीमानाला कशाप्रकारे सक्षम करू शकते हे पाहायला मिळते. शाश्वततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जेथे ऊर्जा-कार्यक्षम डिझाइन्स, पुनर्वापर करण्यायोग्य साहित्य आणि पाण्याची बचत करणाऱ्या नवकल्पना पाहायला मिळतात.
एक्स्पेरिअन्स सेंटर नवीन उत्पाादन श्रेणी लाँच करण्यासाठी, सेवा देण्सासाठी आणि भावी ऑफरिंग्जमध्ये सुधारणा करण्याकरिता ग्राहकांचे अभिप्राय मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून सेवा देईल. लिव्हप्युअरची इतर मेट्रो व प्रमुख शहरांमध्ये देखील ही संकल्पना राबवण्याची योजना आहे, जेथे मागणी व ग्राहक प्रतिसादानुसार वाढ करण्यात येईल


