Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोव्यामध्ये महेश सूर्यवंशी याचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान* केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व...

गोव्यामध्ये महेश सूर्यवंशी याचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान* केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार ; श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थान, बेती (पिळर्ण) यांच्या वतीने आयोजन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल गोवा येथे ‘सर्वोकृष्ट कार्यकारिता जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. गोवा येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थान, बेती (पिळर्ण) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

गोवा येथील श्री शांतादुर्गा मंदिर येथे झालेल्या समारंभाला राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, साळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार केदार नाईक, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, संस्थेचे अध्यक्ष शीतल चोडणकर तसेच पदाधिकारी व गोवेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महेश सूर्यवंशी यांना सामाजिक सेवा, सांस्कृतिक वारशाची जपणूक, आपत्तीग्रस्तांतांसाठी कार्य आणि समाजातील एकात्मता वाढविण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निरंतर कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. या सन्मानानंतर महेश सूर्यवंशी यांनी गोव्याच्या भूमीने दिलेल्या या मान्यतेबद्दल आभार मानले व भविष्यातही समाजसेवेची उर्मी अधिक अधिक जोमाने चालू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments