पुणे, दि. २० ऑगस्ट, २०२५ : देखभालीच्या कामानिमित्त येत्या २७ व २८ ऑगस्ट रोजी शिवसृष्टी बंद राहणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी कळविली आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पात देखभालीची काही कामे करण्यासाठी ती बंद ठेवण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर २९ ऑगस्ट पासून शिवसृष्टी पुन्हा एकदा पहिल्यासारखी सुरु असेल असेही पवार म्हणाले.
२७ व २८ ऑगस्ट रोजी देखभालीसाठी शिवसृष्टी राहणार बंद
RELATED ARTICLES


