देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आपले कन्टेन्ट आणि ओटीटी ऍग्रीगेटर वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपमार्फत युजर्सना घरबसल्या गणेशोत्सवाचा आनंद घेणे सोपे केले आहे. वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपने शेमारूच्या सहयोगाने नामांकित गणपती मंडपाचे लाईव्ह दर्शन घेण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लालबागचा राजा आणि राज्यभरातील अष्टविनायक मंदिरांचा देखील समावेश आहे.
यामध्ये भाविकांना लालबागचा राजाचे अगदी जवळून क्लोज-अप दर्शन घेता येईल. श्री मयुरेश्वर गणपती मंदिर मोरगाव, पुणे, सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक, अहिल्यानगर, श्री महागणपती रांजणगाव आणि श्री चिंतामणी विनायक मंदिर, थेऊर यासारख्या अष्टविनायक मंदिरांचा देखील समावेश असेल. अष्टविनायक मंदिरांचे दर्शन गणेशोत्सव संपल्यानंतर संपूर्ण वर्षभर घेता येईल. २७ ऑगस्टपासून लाईव्ह दर्शनाला सुरुवात होईल. गणपती मंडळांचे थेट प्रक्षेपण ६ सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.
मुंबईभर काही निवडक वी स्टोर्समध्ये देखील कंपनीने लाईव्ह दर्शनाची सुविधा दिली आहे. या निवडक स्टोर्समध्ये एलईडी स्क्रीन्स लावलेल्या असतील, वी ऍपसोबत सिन्क करून या स्क्रीनवर दिवसभर लालबागचा राजाचे दर्शन घेता येईल. वी ५जी कनेक्शन घेण्यासाठी जात असाल किंवा तुमच्या काही समस्यांचे निवारण करण्यासाठी, जरा काही मिनिटे गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेण्याची संधी वी ने उपलब्ध करून दिली आहे. स्टोरमधील हा अनुभव मुंबईकरांना धकाधकीच्या जीवनामध्ये थोडावेळ थांबून शांत, आध्यात्मिक वातावरणात रमण्याची व बाप्पाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देईल.
लाईव्ह दर्शनाची सुविधा असलेल्या स्टोर्सची यादी:
स्टोअर क्षेत्र
पत्ता
1
वांद्रे पश्चिम
दुकान क्रमांक ९, गुरुविद्या एचएस, ए-६२४, वांद्रे पोलीस स्टेशन समोर, हिल रोड, वांद्रे, मुंबई ४०००५०
2
बोरिवली पश्चिम
रायचुरिया हाऊस, दुकान क्रमांक १ आणि २, द्वारका हॉटेलसमोर, ओम ज्वेलर्सच्या पुढे, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई – ४०००९२
3
अंधेरी पूर्व – सहार प्लाझा
शॉप नंबर ७, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, बोनान्झा बिल्डीजी, अंधेरी कुर्ला रोड, कोहिनूर हॉटेलच्या पुढे, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९
4
अंधेरी पश्चिम – चार बंगला
शॉप नंबर १ आणि २, राज गृह अपार्टमेंट, कामधेनू शॉपिंग सेंटरसमोर, चार बंगला, अंधेरी वेस्ट, मुंबई ४०००५८
5
कांदिवली पश्चिम
प्राइम स्क्वेअर, कांदिवली पोस्ट ऑफिस समोर, एस व्ही रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७
6
प्रभादेवी
तळमजला, ३, मिडवे अपार्टमेंट, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५
7
परळ
दुकान क्रमांक ३, सेंटर पॉइंट, भारत माता टॉकीज समोर, परळ, मुंबई – ४०००१२
8
डोंबिवली पूर्व
घनश्याम अपार्टमेंट अंबिका नगर स्टेशन रोडजवळ, डोंबिवली पश्चिम ठाणे ४२१२०२
9
मालाड पूर्व
दुकान क्रमांक ०३, मालाड अजंता सीएचएस लि., आयसीआयसीआय बँकेच्या मागे दत्तारी रोड, मालाड पूर्व, मुंबई-४००९७
10
सीवूड्स
श्री अंबाजी निवास सीएचएल, प्लॉट क्रमांक ४१ सेक्टर ४२, नेरुळ पश्चिम, सीवूड, नवी मुंबई ४००७०६
11
ठाणे पश्चिम
शिवकृपा सहकारी संस्था, मल्हार थिएटरजवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे ४००६०२
वी मुव्हीज अँड टीव्ही सबस्क्रिप्शन घेऊन युजर्सना २० आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आनंद घेता येईल. त्यामध्ये जिओहॉटस्टार, सोनीलिव, झी५, शेमारू आणि इतर अनेक ओटीटी फक्त १४९ रुपयांच्या पुढील किमतीच्या एकाच रिचार्जमध्ये एकाच जागी मिळतील.


