Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedरुग्णांसाठी 'दगडूशेठ' गणपतीचे रुग्णालयातून 'व्हर्च्युअल' दर्शन* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती...

रुग्णांसाठी ‘दगडूशेठ’ गणपतीचे रुग्णालयातून ‘व्हर्च्युअल’ दर्शन* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अजय पारगे आणि संजय पारगे बंधू यांचा अभिनव उपक्रम

 

 

पुणे : भक्ती आणि सेवेची उदात्त परंपरा कायम राखत, यंदा सलग १० व्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ‘इमर्सिव्ह दर्शन’ हे ज्यांना प्रत्यक्ष उत्सवात येणे शक्य नाही अशांसाठी ट्रस्टने उपलब्ध करून दिले आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी द्वारे यंदाच्या सजावटीमध्ये प्रत्यक्ष आपण उभे आहोत तसेच थेट गुरुजींच्या शेजारी उभे राहून आरतीत सहभागी झाल्याचा अनुभव रुग्णांनी घेतला. रुग्णालयात असूनही बाप्पाचे दर्शन घेता आल्याने अनेकांचे डोळे पाणावले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात अजय पारगे आणि संजय पारगे बंधू यांनी पुढाकार घेत हा अभिनव उपक्रम राबविला. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांनी यानिमित्ताने दर्शनाचा आनंद घेतला.

 

आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरुन कुठेही जाता न येणा-या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते. अशा रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ द्वारे आपण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहोत आणि गणरायाच्या मूर्ती समोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी प्रार्थना देखील केली.

 

सन २०१६ मध्ये सुरू झालेला हा सेवा उपक्रम, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून, अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला. बाप्पाप्रती कृतज्ञता आणि परंपरेचा आदर म्हणून पारगे कुटुंबातील तिसऱ्या पिढीने ही सेवा आधुनिक मार्गाने पुढे नेली आहे. हा संपूर्ण उपक्रम डिजिटल आर्ट व्हीआरई प्रा. लि. या कंपनीमार्फत राबवला जातो. दगडूशेठ गणपतीची दिव्य आरती ३६०° कॅमेऱ्यात कैद केली आहे आणि आता ती रुग्णांसाठी खालील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देत आहे:

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’ द्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळत असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. उपक्रमाला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments