Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपियाजिओ वेईकल्‍स आणि हिंदुजा लेलँड फायनान्‍सने भारतात तीन-चाकी वाहनांची मालकी वाढवण्‍यासाठी सहयोग...

पियाजिओ वेईकल्‍स आणि हिंदुजा लेलँड फायनान्‍सने भारतात तीन-चाकी वाहनांची मालकी वाढवण्‍यासाठी सहयोग केला

आकर्षक व सोपे वित्तपुरवठा सोल्‍यूशन्‍स पियाजिओच्‍या आयसीई व इलेक्ट्रिक तीन-चाकी पोर्टफोलिओमध्‍ये किफायतशीरपणा, उपलब्‍धता आणि सुलभ मालकीहक्‍काला चालना देणार

 

पुणे, ०१ सप्टेंबर २०२५: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि भारतातील लहान व्‍यावसायिक वाहनांच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतातील आघाडीची एनबीएफसी हिंदुजा लेलँड फायनान्‍स (एचएलएफ) सोबत रिटेल फायनान्‍स सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगाचा भारतात वेईकल फायनान्सिंग सुव्‍यवस्थित करण्याचा आणि पियाजिओच्‍या तीन-चाकी वाहनांच्‍या मालकीहक्‍काला गती देण्‍याचा मनसुबा आहे, यामध्‍ये इलेक्ट्रिक आणि इंटर्नल कम्‍बशन इंजिन (आयसीई) वेईकल्‍सचा समावेश आहे. पीव्‍हीपीएलचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी आणि एचएलएफचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन पिल्‍लई यांनी करारावर स्‍वाक्षरी केल्‍या.

 

या धोरणात्‍मक सहयोगाचा भाग म्‍हणून हिंदुजा लेलँड फायनान्‍स (एचएलएफ) आयसीई व ईव्‍ही श्रेणीमधील पियाजिओच्‍या सर्व तीन-चाकी वाहनांसाठी वित्तपुरवठा सोल्‍यूशन्‍स देईल. हा सहयोग महत्त्वाचा टप्‍पा आहे, कारण दोन्‍ही कंपन्‍यांचा विजयी सूत्र निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामध्‍ये पियाजिओचा विश्वसनीय उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि एचएलएफच्या सर्वोत्तम वित्तपुरवठा सोल्‍यूशन्‍सचा समावेश असेल.

 

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्‍हणाले, “भारतातील गतीशीलता क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. लघु उद्योजकांपासून ताफा ऑपरेटर्सपर्यंत मालकांचा नवीन वर्ग उदयास येत आहे आणि त्‍यांना त्‍यांच्‍या वास्‍तविकता समजून घेणाऱ्या वित्तपुरवठ्याची गरज आहे. या सहयोगासह पियाजिओ आणि हिंदुजा लेलँड फायनान्‍स दोन्‍ही विश्वसनीय ब्रँड्सच्‍या क्षमता एकत्र आणत आहेत, ज्‍यामुळे वेईकलचे मालकीहक्‍क अधिक सोपे, गतीशील आणि अधिक सहजसाध्य होईल. एकत्रित हा सहयोग गतीशीलतेच्‍या पाठबळासह प्रगती सक्षम करू शकतो, जेथे व्‍यक्‍ती वास्‍तविकत: या गतीशीलतेचा अनुभव घेऊ शकतात.”

 

हिंदुजा लेलँड फायनान्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन पिल्‍लई म्‍हणाले, “हा सहयोग वेईकल वित्तपुरवठ्यामधील आमचे कौशल्‍य आणि पियाजिओच्या तीन-चाकी श्रेणीमधील उपस्थितीला एकत्र आणतो, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या वेईकल्‍स कार्यक्षमपणे संपादित व व्‍यवस्‍थापित करण्‍यास मदत होईल. भारतभरातील आमचे व्‍यापक नेटवर्क व पोहोचचा फायदा घेत हिंदुजा लेलँड फायनान्‍सचा सोल्‍यूशन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे, जे श्रेणीमधील ग्राहकांसाठी लास्‍ट माइल कनेक्‍टीव्‍हीटी, मालमत्ता मालकीहक्‍क आणि उत्‍पन्‍न निर्मितीला साह्य करतील. आमच्‍या वित्तपुरवठा पोहोच व चपळतेला पियाजिओच्‍या उत्‍पादन ऑफरिंग्‍जसोबत एकत्रित करत आम्‍ही सानुकूल वित्तपुरवठा प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी तीन-चाकी वाहन खरेदी करणे अधिक सोपे करत आहोत.”

 

हा सहयोग संपूर्ण भारतात किफायतशीर सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून तीन-चाकी गतीशीलता सोल्‍यूशन्‍स अधिक सहजसाध्य करत बाजारपेठेतील नेतृत्‍व अधिक मजबूत करण्‍याच्‍या पियाजिओ इंडियाच्‍या कटिबद्धतेला दृढ करतो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments