पुणे,2 सप्टेंबर 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रिसायलक्ड गणपती आर्ट गॅलरी, डोनेशन दियाज, क्रिएटिव्ह आर्ट हे अवयव दानाचे महत्त्व सांगणाऱ्या उपक्रमांबरोबरच घर सजावट स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,मोदक स्पर्धा यांसारख्या कलात्मक उपक्रमांचा देखील सहभाग आहे. या उपक्रमांची सांगता अवयवदान प्रश्नमंजुषा आणि अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेद्वारे होईल.
माईम या उपक्रमात विविध व्यक्ती आपल्या कलात्मक सादरीकरणाद्वारे अवयव दानाचे महत्त्व सांगतील.त्याशिवाय रूग्णालयात एक मोठी कॅनव्हास कलाकृती उभी करण्यात आली आहे.त्यामध्ये दान करू शकतो अशी अवयव ब्रश ने रंगवता येतील.या विविध उपक्रमांमध्ये या विषयाचे महत्त्व अनुभवलेले अवयवदाते व प्राप्तकर्ते परीक्षक म्हणून उपस्थित राहतील.
याबाबत माहिती देताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,गणेश उत्सव हा दरवर्षी आपल्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतो.सर्वांनी एकत्र येऊन साजरा करणारा हा सण आहे.याचेच औचित्य साधून जागरूकता आणि कलात्मक कार्यक्रमांचा मिलाफ करत हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न
आहे.


