Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडस टॉवर्सने 17.3 मिलियन लोकांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये सबल करून भारताच्या...

इंडस टॉवर्सने 17.3 मिलियन लोकांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये सबल करून भारताच्या समावेशी विकास प्रवासाचा वेग वाढविला

नॅशनल, 2 सप्टेंबर 2025: इंडस टॉवर्स लिमिटेड जगातील सर्वात मोठ्या दूरसंचार पायाभूत सुविधा कंपन्यांपैकी एक आहे आणि तिने समावेशी विकासासाठीच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा पुष्टी केली आहे. हे तिने आर्थिक वर्ष 2025 मध्ये सक्षम व प्रगती, या आपल्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमांद्वारे 17.3 मिलियनहून अधिक आयुष्यांना सकारात्मक पद्धतीने प्रभावित करून साध्य केले आहे.

 

इंडस टॉवर्सची सीएसआर रणनीती भारताच्या राष्ट्रीय प्राधान्यांशी सखोलपणे अनुरूप आहे, ज्यात सामील आहेत – डिजिटल इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि स्किल इंडिया – आणि यू.एन च्या शाश्वत विकासाच्या ध्येयांना महत्त्वपूर्ण स्वरूपाने सहाय्यकारी ठरत आहे.

 

2030 पर्यंत 150 मिलियन लोकांचे आयुष्य प्रभावित करण्याच्या दृष्टीकोनातून प्रेरणा लाभून श्री. पुष्कर सिंग कटारिया, सीएचआरओ, इंडस टॉवर्स लिमिटेड म्हणाले, “लोकांच्या आयुष्यांचा उद्धार करण्याची आणि क्षमता वाढविण्याची सखोल बांधिलकी इंडस टॉवर्सच्या सामाजिक जबाबदारीच्या केंद्रस्थानी आहे. सक्षम व प्रगती या आमच्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमांद्वारे, कंपनी उपेक्षित समुदायांना त्यांच्या तात्कालिक गरजा पूर्ण करण्यासोबतच त्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना सबल करून या समुदायांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

 

वैविध्य आणि सर्वसमावेशकतेवर भर देत इंडस टॉवर्स मुली आणि महिलांच्या हितासाठी काम करते आणि त्यांना आवश्यक आरोग्य, स्वच्छता आणि सफाईच्या सुविधा उपलब्ध करून देते. इंडस टॉवर्स विविधता आणि समावेशनावर जोरदार लक्ष केंद्रित करते व मुलींच्या आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन करते. त्यायोगे त्यांना आवश्यक आरोग्य, स्वच्छता आणि आरोग्यविषयक यंत्रणा सुविधा उपलब्ध होत आहे, याची खात्री करते. या मिशनमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास मुख्यस्थानी असल्याने व्यक्ती स्वावलंबी आणि समाजासाठी आत्मविश्वासी हातभार लावणारे बनतात. कंपनी शाश्वत विकास उपक्रमांद्वारे व संशोधन आणि विकास भागीदारींद्वारे पर्यावरणीय देखभाल आणि नवोपक्रम सुद्धा स्वीकारते. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनच्या अनुषंगाने डिजिटल साक्षरता निर्माण करून, इंडस टॉवर्स डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि एका वेळी एक आयुष्य सबल करून देशाच्या कानाकोपऱ्यात संधी निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments