Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

31 मार्च 2025 रोजीच्या स्थितीनुसार जोडणी क्षमतेच्या दृष्टीने आघाडीची नॉन-फेरस मेटल रीसायकलर कंपनी सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (“कंपनी”) असून भारतीय सेकंडरी अॅल्युमिनियम बाजारपेठेमध्ये आर्थिक वर्ष 2025 मध्ये कामकाजामधून मिळालेल्या महसुलाच्या आधारावर समकक्ष कंपन्यांमध्ये सर्वाधिक बाजारपेठीय हिस्सा आहे. (स्रोत: ICRA अहवाल). कंपनीने मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केला आहे.

 

 

 

कंपनी प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून इक्विटी शेअर कॅपिटल ऑफरद्वारे निधी उभारण्याचे नियोजन करत आहे. पब्लिक ऑफरमध्ये प्रती शेअर 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 42,890,735 पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या ‘ऑफर फॉर सेल’चा समावेश आहे.

 

 

 

सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला स्थानिक कंपन्यांच्या तुलनेत क्षमतेचा फायदा आहे. कंपनीची 31 मार्च 2025 रोजीच्या स्थितीनुसार देशांतर्गत रीसायकल्ड अॅल्युमिनियम क्षेत्रात प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत सुमारे 4 पट जोडणी क्षमता आहे. कंपनी 31 मार्च 2025 रोजीच्या स्थितीनुसार जोडणी क्षमतेच्या दृष्टीने जागतिक अॅल्युमिनियम रीसायकलिंग उद्योगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाते. तिचा कामकाज महसूल आर्थिक वर्ष 2007 ते आर्थिक वर्ष 2025 या काळात सुमारे 23% CAGR ने वाढला आहे. (स्रोत: ICRA अहवाल).

 

 

 

इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments