Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिरुर मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध*

शिरुर मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध*

*

पुणे दि. ३१: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत शिरूर मतदार संघातील प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.

प्रारुप यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ज्या मतदारांच्या तपशीलामध्ये तफावत आहे तसेच ज्या मतदारांचे २००२ च्या यादीशी मॅपींग झालेले नाही अशा मतदारांसाठी संबधित यादीभागाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणी अंती संबधित मतदाराचे नाव अंतिम यादीत सामविष्ट होईल किंवा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

प्रारूप मतदार यादीत दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ असून सदर कालावधीत संबधित मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचेकडे दावे हरकती सादर करता येतील. प्राप्त दावे हरकतीवर २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुनावणी घेऊन निर्गत करण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

शिरुर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सरु होण्यापुर्वी ४ लाख ८१ हजार ९९० इतके मतदार होते. प्रारूप मतदार यादीनुसार ३ लाख ७२ हजार १४५ इतक्या मतदारांना गणना पत्रक भरून दिलेले आहेत. १८ हजार ८०६ इतक्या मतदारांचे स्थलांतर झाले असून १५ हजार ६२५ मतदार मयत झालेले आहेत. ८ हजार ६८९ इतक्या मतदारांची नावे दुबार असलेचे आढळून आले आहे. ६२८ इतके मतदार इतर कारणासाठी वगळण्यात आले आहेत. नावे वगळलेल्या मतदारापैकी ज्याच्याकडे सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आई वडीलाचे किंवा आजी आजोबा यांचे नाव असल्याबाबतचे पुरावे असल्यास सदर मतदाराने नमूना नं.६ चा अर्ज भरून त्यांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. तसेच ज्यांचे मतदार यादीतील मजकूरामध्ये काही बदल दुरूस्ती करावयाची असल्यास आयोगाने विहित केलेल्या आवश्यक ते कागदपत्रे जोडून त्यांनी नमूना नं-८ चा अर्ज भरुन त्यांचे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. मतदार यादीतील नावाबाबत आक्षेपाबाबत मतदार नोंदणी
अधिकारी,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अपिल दाखल करता येईल. शिरुर विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात पाहणी करीता उपलब्ध आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी
संगीता राजापूरकर यांनी कळविली आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments