Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे फेस्टिवलमध्ये “नृत्यझंकार” स्पर्धेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग

पुणे फेस्टिवलमध्ये “नृत्यझंकार” स्पर्धेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग

 

 

३७ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत झालेली ‘नृत्यझंकार’ महिला नृत्यस्पर्धा आनंदी आणि जोशपूर्ण वातावरणात रंगली. या स्पर्धेत १८ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील महिला स्पर्धकांनी १५ सोलो आणि ११ ग्रुप डान्स सादर करत शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, बॉलिवूड शैली, लावणी अशा विविध नृत्यप्रकारांची रंगतदार मेजवानी रसिकांना दिली.

 

या स्पर्धेचे संयोजन संयोगिता कुदळे यांनी केले होते. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेत्री सानिया चौधरी ( सांग तू आहेस का?, दार उघड बयो, साजणा फेम), नृत्य दिग्दर्शक सँडी सर आणि अभिनेत्री प्रिया कोसुम्बकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहीवेलकर यांनी केले.

 

या वेळी प्रेक्षकांना विशेष आकर्षण ठरली सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांची उपस्थिती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी शिवकुमारश्री, चेतना बिडवे, सोहानी डांगे यांच्या उपस्थितीत स्पर्धा अधिक रंगतदार झाली.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, मोहन टिल्लू, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे, या स्पर्धेच्या समन्वयक संयोगिता कुदळे, दिपाली पांढरे आणि अतुल गोंजारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून झाले.

 

‘नृत्यझंकार’ स्पर्धेत रसिकांनी अनुभवलेला उत्साह, विविध नृत्याविष्कार आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम ३७ व्या पुणे फेस्टिवलमध्ये लक्षवेधी ठरला. पुणे फेस्टिव्हलचे अतुल गोंजारी आणि श्रीकांत कांबळे यांनी व्यवस्थापन पाहिले.

 

या स्पर्धेतून विजेत्या खालीलप्रमाणे ठरल्या :

 

सोलो नृत्य विभागात

🥇 १. पूजा माळी – लावणी

🥈 २. करिश्मा कोठारी – मुजरा

🥉 ३. श्रेया गायकवाड – क्लासिकल

 

 

ग्रुप डान्स विभागात

🥇 १. भावनाज डान्स ग्रुप – महिषासुर मर्दिनी

🥈 २. रणरागिणी ग्रुप – छावा

🥉 ३. मेघवर्षा अकादमी – शिवस्तुती

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments