Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedहर्बालाइफ इंडिया ला बिगबॉक्स इंडिया 2025 मध्ये सस्टेनेबल सप्लाय चेन अवॉर्ड

हर्बालाइफ इंडिया ला बिगबॉक्स इंडिया 2025 मध्ये सस्टेनेबल सप्लाय चेन अवॉर्ड

4 सप्टेंबर 2025, नवी दिल्ली: – आघाडीची आरोग्य व वेलनेस कंपनी हर्बालाइफ इंडियाला बिगबॉक्स इंडिया 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सस्टेनेबल सप्लाय चेन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. या शिखर परिषदेत ई-कॉमर्स व रिटेल क्षेत्रातील भारतातील सर्वात नाविन्यपूर्ण व्यक्ती व संस्था एकत्र आल्या होत्या, जिथे डिजिटल युगात ग्राहक ब्रँड्सशी कसे जोडले जातील यावर चर्चा झाली.

 

हा पुरस्कार हर्बालाइफ इंडियाच्या पुरवठा साखळीतील उत्कृष्टतेबरोबरच पर्यावरणीय जबाबदारीबद्दलच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. बदलत्या बाजारपेठेच्या परिस्थितीशी सुसंगत शाश्वत पद्धती अंमलात आणण्यावर कंपनी सातत्याने लक्ष केंद्रित करत असल्याची दखल या मंचावर घेण्यात आली.

 

हर्बालाइफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अजय खन्ना म्हणाले, “अशा प्रतिष्ठित मंचावर हा पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे. जबाबदार खरेदीपासून उत्पादन वितरणापर्यंत आमच्या सर्व प्रक्रियांमध्ये शाश्वतता रुजविण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. यामुळे आमच्या नैतिक व्यावसायिक पद्धतींची वचनबद्धता अधिक दृढ होते तसेच लोक व समुदायांसाठी अधिक आरोग्यदायी, शाश्वत जग उभारण्याच्या आमच्या ध्येयाला चालना मिळते.”

 

बिगबॉक्स इंडिया 2025 शिखर परिषदेत रिटेल व ई-कॉमर्स क्षेत्रातील लीडर्स, नवोपक्रमक व चेंजमेकर्स सहभागी झाले होते. येथे ओम्नीचॅनल धोरणे, क्विक कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित वैयक्तिकरण, नवीन डी2सी मॉडेल्स यावर चर्चा झाली तसेच पायाभूत सुविधा व नियामक आव्हानांवर विचारविनिमय करण्यात आला. सहकार्य, भागीदारी व ज्ञानविनिमयासाठी या परिषदेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हर्बालाइफ इंडिया’ला मिळालेला हा सन्मान रिटेल व ई-कॉमर्स क्षेत्रात शाश्वत पद्धती राबविण्यातील त्यांच्या नेतृत्वाची पुष्टी करतो.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments