Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीए‌’मध्ये आठव्या आंतरराष्ट्रीय फेरोसिमेंट परिषदेचे आयोजन

बीएनसीए‌’मध्ये आठव्या आंतरराष्ट्रीय फेरोसिमेंट परिषदेचे आयोजन

पुणे, दि. 8 : डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. बीएनसीए आणि पुण्यातील फेरोसिमेंट सोसायटी (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद भरवली जात असून या परिषदेला कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एइएसए) पुणे या संस्थेचे पाठबळ मिळाले आहे. परिषदेचे उद्घाटन सीओएचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते होणार आहे.

 

या परिषदेमध्ये इटली, इंग्लंड आणि अमेरिकेतील तज्ज्ञ अनुक्रमे डॉ. लिबेराटो फेरारा, डॉ. पीट विन्सलो आणि डॉ. अँटोनी नमान सहभागी होणार असून ते फेरोसिमेंटच्या क्षेत्रातील प्रगती, त्याचा परवडणाऱ्या घरांसाठी होणारा वापर, पुनर्बांधणी व दुरूस्ती आणि शाश्वत बांधकामासंबंधी मार्गदर्शन करतील. देशातील प्रसिद्ध एल ॲण्ड टी कंपनीचे संशोधन व विकास विभागाचे प्रमूख डॉ. गोविंदराज हे प्रमुख वक्ते असणार आहेत.

 

परिषदेच्या उपयुक्ततेसंबंधी बोलताना बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले की, फेरोसिमेंटसारखे भविष्यवेधी साधन हे बांधकाम क्षेत्राला दिशा देणारे असून त्याचा या आंतरराष्ट्रीय परिषदेत अंतर्भाव करणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या परिषदेतून जागतिक पातळीवरील अनेक तज्ज्ञांशी संवाद साधताना त्यातून आपल्या व्यावसायिक वाटचालीला आकार देण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळेल असा विश्वास वाटतो.

 

बीएनसीएतील स्ट्रक्चरल सेलच्या प्रमुख डॉ. सुजाता मेहता म्हणाल्या की, फेरोसिमेंट हे बांधकाम क्षेत्रातील तुलनेने अलिकडचे व कमी प्रचलित असून ते एक नाविन्यपूर्ण साधन आहे. या भारतासह जगभरात याचा वापर केलेल्या अगणीत प्रकल्पांमुळे त्याच्या कार्यक्षमतेची कल्पना यापूर्वीच आलेली आहे. त्यामुळेच या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ही ‌‘फेरोसिमेंट बांधकामात कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर‌’ अशी आहे. जागतिक पातळीवरील नवे संशोधन, नवकल्पना आणि त्याचा प्रत्यक्ष वापर याबाबत या परिषदेमध्ये सादरीकरण केले जाईल. तसेच पर्यावरणपूरक वा भूकंपविरोधी गुणधर्माचे फेरोसिमेंटच्या क्षेत्रात भारत हा जागतिक फेरोसिमेंट क्षेत्रातील नवकल्पनांचे केंद्र बनत असताना पुणे हे त्यामध्ये आघाडीवर आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की, साधी व प्रभावी रचना असणाऱ्या फेरोसिमेंटमध्ये लोखंडी जाळीच्या थरात सघन सिमेंट भरले जाते. त्यातून तयार होणारी रचना मजबूत, जलरोधक, लवचिक आणि धक्कारोधक असते. त्यामध्ये जाड खडी तसेच मोठे साचे न वापरल्यामुळे खर्चाची बचत होण्यास व पर्यावरणीय दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. याशिवाय गुंतागुंतीचे व नियोजित आकृतीबंधात (डिझाईन) त्याचा अचूक वापर शक्य असल्यामुळे ते आर्किटेक्चर क्षेत्रात लोकप्रिय ठरले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क : sujata.mehta@bnca.ac

.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments