Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedएल्डोरॅडो अॅग्रीटेक तर्फे 1000 कोटी रु. आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

एल्डोरॅडो अॅग्रीटेक तर्फे 1000 कोटी रु. आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

श्रीकर सिड्स या ब्रँडसाठी ओळखली जाणारी ‘सीड टू हार्वेस्ट’ सोल्युशन्स पुरवठादार कंपनी एल्डोरॅडो अॅग्रीटेक लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) 1000 कोटी रु. उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केले आहे.

 

 

 

डीआरएचपी नुसार या तेलंगणास्थित कंपनीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 340 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडून 660 कोटी रु. पर्यंतच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा एकत्रित समावेश आहे.

 

 

 

OFS चा भाग म्हणून, प्रवर्तक श्रीनिवास राव लिंगा आणि उषा राणी पापिनेनी अनुक्रमे 500 कोटी रु. आणि 160 कोटी रु. चे शेअर्स ऑफलोड करतील.

 

 

 

एल्डोरॅडो अॅग्रीटेकने फ्रेश इश्यूमधील निव्वळ उत्पन्नामधून 245 कोटी रु. चा निधी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा निधी ठराविक थकबाकी कर्जाची अंशत: पूर्वपरतफेड किंवा परतफेड करण्यासाठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येणार आहे.

 

 

 

कंपनी ग्राहकांना सर्वसमावेशक ‘सीड टू हार्वेस्ट’ सोल्युशन्स पुरवते. त्यामध्ये बीज नवकल्पना ते पीक संरक्षण उत्पादनांपर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट असून संशोधन व विकास (R&D), उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि बियाण्यांचे वितरण या सर्वांमध्ये कंपनी कार्यरत आहे. त्यामध्ये विविध हायब्रिड्स आणि ओपन पोलिनेटेड व्हरायटीज (OPV) यांचा समावेश आहे. F&S रिपोर्टनुसार, महसूल वृद्धीच्या दृष्टीने भारतातील सूचीबद्ध समकक्ष कंपन्यांमध्ये ही सर्वात वेगाने वाढणारी कृषी विज्ञान कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 ते 2025 दरम्यान 27.92% CAGR नोंदवला आहे आणि उच्च दर्जाची बियाणे आणि पीक संरक्षण उत्पादने पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

 

 

 

कंपनी मका, भात (तयार झालेला तांदूळ), कापूस, गहू, बाजरी (पर्ल मिलेट) तसेच विस्तृत पोर्टफोलिओ असलेली भाजीपाला बियाणे या प्रमुख पिकांमध्ये बियाणे सादर करते. कंपनीकडे 47 पिकांसाठी 226 हायब्रिड्स आणि OPV बियाण्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आहे.

 

 

 

30 जून 2025 पर्यंत, एल्डोरॅडो अॅग्रीटेकने सेंट्रल इन्सेक्टिसाइड्स बोर्ड आणि रजिस्ट्रेशन कमिटी (CIBRC) कडून त्यांच्या कृषी रसायन फॉर्म्युलेशन्ससाठी 269 नोंदण्या प्राप्त केल्या आहेत आणि भारतीय पेटंट्स अॅक्ट, 1970 अंतर्गत कृषी रसायन उत्पादनांसाठी 9 पेटंट अर्ज केले आहेत. जोडीला खत (नियंत्रण) आदेश (FCO), 1985 अंतर्गत विशेष खत उत्पादनांसाठी 43 नोंदणी आहेत आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून बायो-स्टिम्युलंट उत्पादनांसाठी 32 नोंदणी मिळवल्या आहेत.

 

 

 

आर्थिक बाबतीत कंपनीने आर्थिक वर्ष 25 मध्ये 441 कोटी रु. चे कामकाजामधून उत्पन्न आणि 71 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला आहे.

 

 

 

आनंद राठी अॅडव्हायजर्स लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

डीआरएचपी लिंक:

 

https://nsearchives.nseindia.com/corporate/Registration_03092025200151_EldoradoAgritechLimitedDRHP.pdf

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments