Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पूर्वांचलातील विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पूर्वांचलातील विद्यार्थ्यांशी संवाद

फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि ‘ईश्वरपुरम्’ या विद्यार्थी वसतिगृहास दिली भेट

 

पुणे, दि. १२ सप्टेंबर, २०२५ : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच फुलगांव परिसरातील विविध संस्थांना सदिच्छा भेट दिली. वढू व तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्याच्या कार्यक्रमानंतर त्यांनी या भेटी दिल्या.

 

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देऊन सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारली आणि नंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकही पाहिले. तसेच लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले मा. शिवेंद्रसिंहराजे यांचे ६ फूट x ६ फूट आकाराचे चित्र पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांचे सोबत लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपकजी पायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, नरहरी पाटील व संस्थेचे क्षिरसागर उपस्थित होते.

 

त्यानंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेजारील ‘ईश्वरपुरम्’ या भारताच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संदीप पूरकर, बाळासाहेब चांदेरे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना परिसरातील बांधकाम प्रगतीची माहिती दिली.

 

वसतीगृहातील विद्याथ्यांनी त्यांच्यासमोर मराठी व हिंदीतून प्रार्थना सादर केली असता छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे वास्तव्यास असणाऱ्या चीन म्यानमारच्या सरहद्दीवरील विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना अनेकानेक शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी शिवेंद्रसिंह भोसले यांना ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी यांनी संस्थेची माहिती सांगितली. तर संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब चांदेकर व युवराज पाटील तसेच पंकज जगताप, राहुल वागसकर आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments