Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपर्वती दर्शन येथे तहसीलस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

पर्वती दर्शन येथे तहसीलस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : पुणे शहर तहसीलस्तरीय लोकशाही दिन तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कै. नारायण देवचंद भामरे हॉल, पर्वती दर्शन, पुणे येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली.

 

या दिवशी नागरिकांना त्यांच्या विविध शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी, मागण्या व समस्या लेखी स्वरुपात मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपले अर्ज व मागण्या नियोजित दिवशी सदर ठिकाणी दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार श्री. येवले यांनी केले आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments