Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedट्रायटन व्हॉल्व्हज ने साजरी केली 50 गौरवशाली वर्षे

ट्रायटन व्हॉल्व्हज ने साजरी केली 50 गौरवशाली वर्षे

बंगळुरू ,11 सप्टेंबर 2025 : भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह टायर व्हॉल्व्हज उत्पादक आणि जगभरातील उद्योगांसाठी आघाडीची अभियांत्रिकी भागीदार असलेल्या ट्रायटन व्हॉल्व्हज लि.ने 10 सप्टेंबर 2025 रोजी आपला 50 वा वर्धापन दिन साजरा केला. म्हैसूर हॉल, आयटीसी गार्डेनिया, बंगळुरू येथे पार पडलेल्या सोहळ्यात ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रमुख नेतृत्व, भागीदार व उद्योगातील नेतृत्व उपस्थित होते. हा सोहळा म्हणजे कंपनीचा पाच दशकांचा उत्कृष्टता, अभिनवता आणि लवचिकतेच्या प्रवासाचा प्रतीक होता.

 

या सोहळ्यात म्हैसूरचे महाराजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार, इन्फोसिसचे सहसंस्थापक व अध्यक्ष नंदन नीलकणी व एथर एनर्जीचे सहसंस्थापक स्वप्नील जैन यांसह उद्योगातील नेतृत्व, भागीदार आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वत: यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी रूपा पै लिखित “कोअर स्ट्रेंथ” या पुस्तकाचे अनावरण केले. यानंतर कथाकथन सत्र व पुस्तकातील एका भागाचे वाचन करण्यात आले.

 

याप्रसंगी बोलताना यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार म्हणाले की, “ट्रायटन व्हॉल्व्हज हे म्हैसूरच्या अभिनवतेच्या वारसाचे आणि भारताचे स्वावलंबनाच्या भावनेचे एक अभिमानास्पद उदाहरण आहे. गेली 50 वर्षांपासून कंपनीने केवळ भारतातच नव्हे जगभरात सेवा देत गुणवत्ता, लवचिकता आणि विविधतेचे उदाहरण दिले आहे. 2047 पर्यंत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना, ट्रायटन आपल्या सर्वांना मेक इन इंडियाच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यासाठी आणि समर्पण, दूरदृष्टी आणि उत्कृष्टतेच्या वचनबध्दतेतून साकार झालेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करते.”

 

भारताची उद्योजकता आणि प्रगती साजरी करताना, या कार्यक्रमात “ऑनरिंग द पास्ट, इनस्पायरींग द फ्युचर” या विषयावर फायरसाइड चॅटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र आले होते. यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक व अध्यक्ष नंदन नीलकणी व एथर एनर्जीचे सहसंस्थापक स्वप्नील जैन व आदित्य एम.गोकर्ण यांचा सहभाग होता.

 

प्रसिध्द फायनान्शियल कंटेट क्रिएटर सोनिया शेणॉय यांनी संयोजित केलेल्या या सत्रात उद्योजकांच्या प्रवासाचा आढावा, उदयोन्मुख क्षेत्रातील संधी, बदलणारी आव्हाने, सरकार व धोरणात्मक पाठबळ, संशोधन व विकासाचे महत्त्व, कार्य संस्कृती आणि भारताच्या आर्थिक प्रगतीशी सुसंगत उदयोन्मुख प्रवाह यांवर चर्चा झाली.

 

ट्रायटनच्या मार्गदर्शक शक्ती असलेल्या अनुराधा गोकर्ण यांनी ग्राहक, भागधारक, लेखापरीक्षक, भागीदार आणि पाहुण्यांचे मनापासून आभार मानले. कंपनीच्या 50 वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकत, त्यांनी स्वत:ची प्रेरणादायी कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, “ट्रायटनचा 50 वर्षांचा प्रवास हा केवळ कॉर्पेारेट टप्पा नसून लवचिकता आणि दूरदृष्टीतून वास्तवात रूपांतर झालेली स्वप्नांची कहाणी आहे. 1975 मध्ये संस्थापकाच्या स्वप्नापासून,आव्हानांवर मात करण्यापर्यंत आज मेड इन इंडियाचे अभिमानास्पद प्रतीक म्हणून उभी असलेली कंपनी निर्माण करण्यापर्यंत हे सर्व आमचे कर्मचारी, भागीदार आणि हितचितकांचे सामुहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. ट्रायटन केवळ एक कंपनी नसून विश्वास, चिकाटी आणि देशाच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्याच्या वचनबध्दतेवर उभारलेले कुटुंब आहे.”

 

ट्रायटनच्या 50 वर्षांचा टप्पा साजरा करण्यासाठी इंडिया पोस्ट ने एक विशेष कव्हर प्रकाशित केले. अनुराधा एम.गोकर्ण यांनी या हृदयस्पर्शी समारंभात जीपीओ बंगळुरूच्या पोस्टल सर्व्हिसेसच्या संचालक श्रीमती तारा यांच्याकडून हा स्टँम्प स्विकारला.

 

याप्रसंगी बोलताना आदित्य एम.गोकर्ण यांनी कंपनीच्या अभूतपूर्व प्रवासाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, “हा सुवर्णमहोत्सव केवळ व्यवसायातील टप्पा पार करण्याचा उत्सव नसून माझे वडील एम.व्ही.गोकर्ण आणि माझी आई अनुराधा गोकर्ण यांच्या अभूतपूर्व नेतृत्वाला आदरांजली आहे. त्यांनी आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करून ट्रायटनला भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनवले. त्यांचा वारसा आम्हाला रोज प्रेरित करतो. भविष्याकडे पाहताना ट्रायटन अभिनवतेला चालना देण्यासाठी गतीशीलतेला बळ देण्यासाठी आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेमध्ये भारताचे भविष्य घडविण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही फक्त व्हॉल्व्हज बनवत नाही, तर भारताला गतीमान ठेवणारी पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत.”

 

ट्रायटन व्हॉल्व्हजच्या 50 व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात आदित्य गोकर्ण यांनी कंपनी स्थापन केल्याबद्दल आपल्या पालकांचे आभार मानले आणि वडिलांचा वारसा प्रेरक शक्ती म्हणून पुढे सुरू ठेवण्यावर विश्वास व्यक्त केला. तसेच पुढील 50 वर्षात कंपनीच्या विकासाबाबत विश्वास व्यक्त करताना कर्मचारी, ग्राहक, भागीदार आणि पाहुण्यांचे आभार मानले.

 

ट्रायटन व्हॉल्व्हजचा सुवर्ण महोत्सव हा भारतीय उद्योजकता आणि उत्पादनातील उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व करतो. 1975 मध्ये स्थापनेपासून ते आज बाजारपेठेतील 70 टक्के वाटा मिळवण्यापर्यंत भारतीय रस्त्यांवरील प्रत्येक तीन टायर पैकी दोन टायर हे ट्रायटनच्या व्हॉल्व्हज ने सज्ज आहे. 488.37 कोटी रूपयांचा एकत्रित महसूल आणि 21.3 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दरासह ट्रायटन आपले पुढील पाऊल उचलताना भारताच्या गतिशीलतेला बळकटी देण्यासाठी आणि जागतिक, आर्थिक स्तरावर आघाडीचा देश म्हणून उदयास येण्यामध्ये योगदान देण्यासाठी वचनबध्द आहे. ऑटोमोटिव्ह पासून एरोस्पेस,एचव्हीएसी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी अशा विविध उद्योगांना सेवा देत ट्रायटनचा विस्तार 12 देशांमध्ये झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments