Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजारांवर जनजागृतीच्या दिशेने आणखी एक पाऊल : युनिसेफ इंडिया आणि...

बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजारांवर जनजागृतीच्या दिशेने आणखी एक पाऊल : युनिसेफ इंडिया आणि पत्रसूचना कार्यालयातर्फे कार्यशाळेचे आयोजन

असंसर्गजन्य आजार (एनसीडी) ही एक छुपी आणीबाणीसदृश स्थिती झाली असून राज्यातील सहा दशलक्षाहून अधिक बालके या आजारांनी प्रभावित झाली आहेत. मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल आजार आणि स्थूलता हे एकेकाळी प्रौढांचे समजले जाणारे आजार आता लहान मुलांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. जागतिक पातळीवर विचार करता हे एनसीडी एकूण मृत्यूंपैकी तब्बल 71 टक्के मृत्यूंना कारणीभूत असल्याचे दिसते. भारतात, तीनपैकी दोन मृत्यू अशा प्रकारच्या आजारांनी झालेले दिसतात. महाराष्ट्रात देखील हाच कल दिसून येत असून राज्यात टाईप 1 प्रकारच्या मधुमेहाचे सुमारे 2,000 नवे रुग्ण आणि जन्मजात हृदयरोगाचे 20,000 ते 25,000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 3.3 दशलक्ष बालकांना दम्याचा त्रास असून 8.8 दशलक्ष बालकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मानसिक विकार जडलेला आहे. राज्यामध्ये बाल्यावस्थेतील स्थूलतेचे प्रमाण देखील वाढत असून 2.4 दशलक्ष लठ्ठ मुलांसह एकूण सहा दशलक्षांहून अधिक मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे असे दिसते.

 

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments