गुरूग्राम, भारत – सप्टेंबर १५, २०२५ – सॅमसंगने आज सणासुदीच्या काळापूर्वी गॅलेक्सी ए०६ ५जीच्या अभूतपूर्व किमतीची घोषणा केली. आजपासून गॅलेक्सी ए०६ ५जी लिमिटेड-पीरियड ऑफरचा भाग म्हणून फक्त ९८९९ रूपयांपासून उपलब्ध असेल.
ही डिल फिचर फोन किंवा ४जी स्मार्टफोनवरून गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये अपग्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी परिपूर्ण संधी देते, जो किफायतशीर दरामध्ये परिपूर्ण ५जी अनुभव देतो. तसेच, उत्सवी डिलचा भाग म्हणून गॅलेक्सी ए०६ ५जी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १३९९ रूपयांचा सॅमसंग २५ वॅट ट्रॅव्हल अॅडप्टर फक्त २९९ रूपयांना मिळेल. अधिक किफायतशीरपणाचा शोध घेत असलेले ग्राहक प्रतिमहिना फक्त ९०९ रूपयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
गॅलेक्सी ए०६ ५जी वरील उत्सवी डिलमधून डिजिटल तफावत दूर करण्याप्रती आणि लाखो ग्राहकांना परिपूर्ण ५जी अनुभवासह सक्षम करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. सर्वात किफायतशीर गॅलेक्सी ए सिरीज ५जी स्मार्टफोन गॅलेक्सी ए०६ ५जी ग्राहकांना विश्वसनीय कार्यक्षमता व दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणासह अधिक मूल्य देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये सुधारित नेटवर्क कनेक्टीव्हीटी आणि जलद स्पीड्ससाठी सर्व नेटवर्कची कॉम्पॅटिबिलिटी, १२ ५जी बँड्स आणि फिचर्स कॅरिअर संयोजन आहे. मीडियाटेक डी६३०० प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी ए०६ ५जी शक्तिशाली कार्यक्षमतेची खात्री देतो, तसेच मल्टीटास्किंग, गेमिंग व स्ट्रिमिंगचा विनासायास आनंद देतो. या स्मार्टफोनमध्ये जवळपास १२ जीबी रॅमसह रॅम प्लस वैशिष्ट्य आहे.
गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये सुस्पष्ट व आकर्षक फोटो कॅप्चर करण्यासाठी ५० मेगापिक्सल मेन रिअर कॅमेरा आणि अधिक सुस्पष्टतेसाठी २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे, तसेच ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा उच्च दर्जाच्या सेल्फी व व्हिडिओ कॉल्सची खात्री देतो. या स्मार्टफोनमध्ये स्लीक व स्टायलिश डिझाइन आहे, तसेच व्यापक ६.७ इंच एचडी+ डिस्प्लेसोबत वैविध्यपूर्ण व्हिज्युअल अनुभवाची खात्री मिळते. गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये ५,००० एचएएच बॅटरीसह श्रेणीमधील सर्वोत्तम २५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए०६ ५जी सह विश्वसनीयतेला नव्या उंचीवर नेत आहे, जेथे ओएस अपग्रेड्सच्या ४ जनरेशन्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आहेत. यामधून या श्रेणीमध्ये ब्रँडला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी अद्वितीय कटिबद्धता दिसून येते. टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आलेला गॅलेक्सी ए०६ ५जी आयपी५४ रेटिंगसह येतो, ज्यामधून धूळ व ओरखड्यांपासून संरक्षणाची खात्री मिळते.
गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये ‘वॉईस फोकस’ वैशिष्ट्य देखील आहे. हे ‘मेक फॉर इंडिया’ नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य गोंधळ असलेल्या ठिकाणी कॉलवर सुस्पष्टपणे ऐकू येण्याची खात्री देते, ज्यामुळे संवाद सुस्पष्टपणे व अधिक प्रभावीपणे करता येतात. गॅलेक्सी ए०६ ५जी मध्ये सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्य देण्यात आले आहे, जेथे सॅमसंगची डिफेन्स-ग्रेड नॉक्स वॉल्ट सुरक्षितता आहे, ज्यामुळे वापरकर्ते सुरक्षितपणे त्यांच्या डेटाचे व्यवस्थापन करू शकतात आणि त्यांचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक उत्साहपू
र्ण होतो.


