Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीएसटी पेमेंटसाठी डीबीएस बँक इंडियाला एजन्सी बँक म्हणून अधिकृत मान्यता व्यवसायांसाठी...

जीएसटी पेमेंटसाठी डीबीएस बँक इंडियाला एजन्सी बँक म्हणून अधिकृत मान्यता व्यवसायांसाठी रिअल-टाइम आणि सुलभ जीएसटी पेमेंट सक्षम करते

मुंबई, 22 सप्टेंबर 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डीबीएस बँक इंडियाला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पेमेंट गोळा करण्यासाठी एजन्सी बँक म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. आरबीआयकडून जीएसटी पेमेंटसाठी मंजुरी मिळालेली भारतातील ही एकमेव पूर्ण मालकीची उपकंपनी ठरली आहे.

 

डीबीएस बँक इंडियाचे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म, डीबीएस आयडियल वापरून ग्राहकांना आता त्वरित जीएसटी पेमेंट करणे शक्य होईल. या प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना जीएसटी पेमेंटची पावती त्वरित डाउनलोड करणे शक्य होईल, व्यवहाराचा सध्याचा स्टेटस जाणून घेता येईल आणि कस्टमर केअरद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करू शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म आयडियलसोबतच ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार एनईएफटी/आरटीजीएसद्वारे किंवा बँकेच्या शाखांमध्ये काउंटरवर जाऊन पेमेंट देखील करू शकतात. या ऑफरमुळे ग्राहकांना केवळ सर्व व्यावसायिक आणि आवश्यक पेमेंट एकत्रित करण्यास सक्षम केले जाणार नाही तर एका मजबूत डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे जीएसटी अनुपालन देखील सुलभ होईल.

 

2017 मध्ये लाँच झाल्यापासून, जीएसटीने भारताच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीयरीत्या बदल केले आहेत. यामुळेच 20251 मध्ये नोंदणीकृत करदात्यांची संख्या 60 लाखांवरून सुमारे 1.51 कोटी झाली आहे. अर्थात, अनेक व्यवसायांना अजूनही काही प्रमाणात ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये खंडित वर्कफ्लो, मॅन्युअली चलन अपलोड आणि वेळखाऊपणाचा समावेश आहे. बहु-स्तरीय मंजुरी आणि रिअल-टाइम अलर्ट किंवा मोबाइल वर्कफ्लोच्या अनुपस्थितीमुळे होणाऱ्या विलंबाचा फटका बसू शकतो आणि ऑपरेशनल जोखीम वाढू शकते. उद्योगांसाठी एक अखंड, सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंट अनुभव देऊन डीबीएस बँक इंडिया या समस्यांचे निराकरण करत आहे.

 

डीबीएस बँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री हेड – ग्लोबल ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेस, कॉर्पोरेट बँकिंग – फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड एसएमईज, दिव्येश दलाल म्हणाले, “जीएसटी भरणे ही उद्योगांसाठी एक अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यामुळेच डीबीएस बँक इंडिया ही प्रक्रिया अधिक सुलभ तसेच कार्यक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. डीबीएस आयडियलमध्ये जीएसटी पेमेंटचा समावेश करून, आम्ही आता व्यवसायांना एक सुरक्षित प्लॅटफॉर्म प्रदान करतो जो रिअल-टाइम दृश्यमानता, सुलभता आणि अधिक कार्यक्षमता प्रदान करतो. उद्योगांना त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या प्रभावीपणे राबवण्यासाठी मदत म्हणून डीबीएसचा हा प्लॅटफॉर्म अत्यंत योग्य आहे. आणि व्यावसायिकांना ही ऑफर देऊन आम्ही योग्य उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता दर्शवतो.”

 

डीबीएस बँक इंडिया त्यांच्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायांसाठी जीएसटी पेमेंट सुलभ करते. ग्राहकांना या अंतर्गत पेमेंटची त्वरित पावती, व्यवहाराचे ट्रॅकिंग आणि सर्व जीएसटी पेमेंटचा एकत्रित आढावा अशा सुविधा मिळतात. परिणामी, सक्रिय देखरेख करणे शक्य होते तसेच डेडलाइन चुकणे आणि दंडाचा भुर्दंड असे धोके कमी होतात. अधिक अचूकता, पारदर्शकता, दृश्यमानता आणि सर्वात महत्त्वाचे – नियंत्रण देऊन, डीबीएस बँक व्यावसायिकांना त्यांच्या जीएसटी संबंधी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सक्षम करते.

 

ग्लोबल फायनान्सने सलग 16 वर्षे (2009-2024) डीबीएसला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून मान्यता दिली आहे. तिच्या डिजिटल नेतृत्वासाठी तिचे कायमच कौतुक झाले आहे. 2025 मध्ये युरोमनीने तिला भारतातील एसएमईसाठी सर्वोत्तम डिजिटल बँक म्हणून गौरवले आहे. 2025 मध्ये, डीबीएस बँक इंडियाला क्रिसिल कोलिशन ग्रीनविचने कॉर्पोरेट बँकिंगसाठी सर्वोत्तम बँक (विदेशी बँक), भारतातील कॉर्पोरेट्ससाठी सर्वोत्तम बँक – डिजिटल, भारतातील कॉर्पोरेट्ससाठी सर्वोत्तम बँक – व्यवसाय करण्याची सोय आणि भारतातील कॉर्पोरेट्ससाठी सर्वोत्तम बँक – केवायसी प्रक्रिया आणि समर्थन असे पुरस्का

र दिले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments