Saturday, October 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे २४ व...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे २४ व २५ सप्टेंबर रोजी पुणे व बारामती दौऱ्यावर

पुणे दि. 23 (जिमाका, वृत्त सेवा) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (संसदीय दर्जा) गोरक्ष लोखंडे हे दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी पुणे व बारामती येथे दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे.

 

 

 

दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील समिती सभागृहात कुलसचिव पुणे विद्यापीठ यांच्या उपस्थितीत अनुकंपा बाबत, लाड पागे बाबत, तसेच शिष्यवृत्ती संदर्भात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठकीचे आयोजन. दुपारी ४.०० वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या सोबत “दलित वस्ती सुधारणा योजना” संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

 

 

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी पुणे येथून शासकीय विश्रामगृह, बारामती येथे पोहचतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे संविधान विषयक जागृतीबाबत मार्गदर्शन करतील. यानंतर पंचायत समिती, बारामती व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

 

 

 

तरी नागरिकांनी त्यांच्या समस्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (संसदीय दर्जा) गोरक्ष लोखंडे यांचेकडे सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments