मणिपाल हॉस्पिटल्स खराडी पुणे येथे हृदयाची झडप बदलण्याची मिनिमली इनव्हेजिव्ह प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली
पुणे,: मणिपाल हॉस्पिटल्स, खराडी, पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट्सनी गंभीर स्वरूपाचे एऑर्टिक स्टेनोसिस व इतर अनेक उपव्याधी असलेल्या एका 70 वर्षीय महिलेवरील ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेन्ट (TAVI)सह बलून-असिस्टेड BASILICA ही दुर्मिळ प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
रुग्णाला स्थूलपणा, उच्चरक्तदाब, हायपोथायरॉइझम, COPD आणि OSA हे आजार पूर्वीपासून होते. तसेच त्यांना गंभीर स्वरूपाचे व्हॉल्व्ह स्टेनोसिस असल्याने डिस्पनिया (श्वास न पुरणे) तसेच छातीत दुखण्याचा त्रासही होता. हृदयाची झडप बदलण्यासाठी ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी केल्यास अपंगत्व वा मृत्यूची मोठी शक्यता होती. तब्येत बरी होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबाने ओपन हार्ट सर्जिकल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटच्या ऐवजी शरीराला कमीत-कमी छेद घेऊन केल्या जाणाऱ्या म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रियेला पसंती दिली, त्यामुळे डॉक्टरांनी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (TAVI)चा पर्याय सुचवला.
या केसविषयी बोलताना मणिपाल हॉस्पटल, खराडीच्या कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. तन्मय यरमळ जैन म्हणाले, “70 वर्षीय रुग्णाला सिम्प्टोमॅटिक सीव्हिअर एऑर्टिक स्टेनोसिस असल्याने महाधमनीची झडप बदलणे म्हणजे आओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याची गरज सूचित होत होती. रुग्णाचे वय, उपव्याधी आणि कोरोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होण्याच्या वाढलेल्या शक्यता यांच्यामुळे ही केस अत्यंत जोखमीची बनली होती. रुग्णाच्या हृदय व रक्तवाहिन्यांच्या विशिष्ट रचनेमुळे या प्रकरणामध्ये गुंतागूंतीचा आणखी एक पदर जोडला गेला होता: व्हालसाल्व्हाच्या अरुंद पोकळ्या, झडपेच्या पाख्यांवर कॅल्शियमचे साचलेले थर आणि खूप कोरोनरी आर्टरीज खाली असणे अशा या रचनेमुळे TAVI च्या दरम्यान कोरोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. TAVI नंतर उद्भवू शकणारा धोका कमी करण्यासाठी आम्ही बलून-असिस्टेड BASILICA तंत्र वापरण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेमध्ये झडपेच्या खराब झालेल्या पाख्याचे हेतूत: विभाजन करण्यासाठी बलूनच्या आधारे इलेक्ट्रिक गाईडवायर्सचा उपयोग केला जातो, ज्यामुळे रक्त मोकळेपणाने वाहते व झडपांना कोरोनरी आर्टरीतील रक्तप्रवाहात अडथळा आणण्यापासून रोखले जाते व त्यानंतर खराब झालेल्या एऑर्टिक व्हॉल्व्हच्या ठिकाणी नवीन एऑर्टिक व्हॉल्व्ह बदलला जातो. ही गुंतागूंतीची शस्त्रक्रिया पायावाटे, बाहेरून एकही टाका न घालता पार पाडण्यात आली. रुग्णाला प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी हालचाल करता येऊ लागली व चौथ्या दिवशी त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यात आले.”
मणिपाल हॉस्पिटल्स, खराडीचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री. परमेश्वर दास म्हणाले, “मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिअॅक सायन्सेस (MICS)मध्ये आम्ही काही सर्वाधिक गुंतागूंतीच्या कार्डिअॅक केसेस हाताळण्याची आमची क्षमता दाखवून देत आहोत. TAVI सह बलून-असिस्टेड BASILICA ही इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील सर्वाधिक गुंतागूंतीची प्रक्रिया आहे व ती क्वचितच केली जाते. आम्ही आमच्या रुग्णाला हा प्रगत, मिनिमली इन्व्हेजिव्ह पर्याय पुरवू शकलो व त्यातून सुरक्षित परिणाम घडवून आणू शकलो, याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. या केसमधून दुर्मिळ आणि गुंतागूंतीच्या कार्डिअॅक प्रक्रिया अचूकतेने व सुरक्षितपणे हाताळण्याची आमची क्षमता दिसून येते.”
ही शस्त्रक्रिया डॉ. तन्मय यरमळ जैन, डॉ. सूरज नृसिंहन आणि मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणेच्या कार्डिओलॉजी टीमने यशस्वीपणे पार पाडली.


