बॉब के संग त्यौहार की उमंग – शुभ भी, लाभ भी” या उपक्रमांतर्गत बँक ऑफ बडोदाने आपल्या रिटेल आणि एमएसएमई ग्राहकांसाठी सणासुदीसाठी विविध आणि खास ऑफर्स आणल्या आहेत.
हा उपक्रम ग्राहकांचा सणाचा आनंद द्विगुणित करणारा असून, त्यात आकर्षक व्याजदर, सवलती व मूल्यवर्धित सुविधा समाविष्ट आहेत.
मुख्य सणासुदीच्या ऑफर्स :
गृहकर्ज :
· विशेष व्याजदर वर्षाकाठी केवळ ७.४५ टक्क्यांपासून सुरू, प्रक्रिया शुल्क शून्य
· महिला ग्राहक, तरुणाई व मिलेनियल्स (वय ४० वर्षांखालील) यांच्यासाठी व्याजदरात अतिरिक्त सवलत
· टॉप-अपची सहज सुविधा
· दैनंदिन घटती शिल्लक पद्धतीने व्याज आकारणी
कार कर्ज :
· आकर्षक व्याजदर
· निश्चित आणि फ्लोटिंग या दोन्ही व्याजदर पर्यायांवर दैनंदिन घटती शिल्लक पद्धती
· फ्लोटिंग व्याजदर असलेल्या व्यक्तींनी कर्जाची आगाऊ परतफेड केल्यास त्यांना कोणतेही शुल्क लागू नाही.
· कर्ज परतफेडीचा अतिरिक्त कालावधी : ८४ महिन्यांपर्यंत, विद्युत वाहनांसाठी ९६ महिने
· विद्युत वाहनांसाठी प्रक्रिया शुल्कामध्ये ५० टक्के सवलत
· वाहनाच्या ऑन-रोड किंमतीच्या ९० टक्क्यांपर्यंत वित्तसाह्य
· बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जलद मंजुरी
बॅक ऑफ बडोदाने सोने व मॉर्गेज कर्जांवर मर्यादित काळासाठी व्याजदर सवलतही आणली आहे.
बॉब मास्टरस्ट्रोक लाईट बचत खाते :
‘बॉब मास्टरस्ट्रोक सेव्हिंग्स अकाउंट’च्या यशानंतर, बॅक ऑफ बडोदाने त्याची अधिक समावेशक व किफायतशीर आवृत्ती – बॉब मास्टरस्ट्रोक लाईट सादर केली आहे.
या खात्यासाठी मासिक सरासरी शिल्लक कमी असून, विविध खास ऑफर्स या खात्यासाठी देण्यात आल्या आहेत. भोजन, प्रवास व मनोरंजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित लाभांसह अपघाती विमा आणि इतर आकर्षक सुविधा यात समाविष्ट आहेत.
· इझमायट्रिप डेबिट कार्ड मोफत – आकर्षक ऑफर्ससह
· एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएस हे व्यवहार मोफत
· लॉकरसाठी ७५० रुपयांची थेट सवलत
· कर्जावरील प्रक्रिया शुल्कात व व्याजदरात सवलत
· एटर्ना क्रेडिट कार्ड आजीवन मोफत (*नियम व अटी लागू)
बॉब स्मार्ट करंट अकाउंट :
डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यवसायांसाठी खास डिझाइन केलेले हे करंट अकाउंट आहे.
· एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएस / यूपीआय हे व्यवहार मोफत
· १ पीओएस / एमपीओएस व २ साउंडबॉक्स क्यूआर मोफत
· कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आजीवन मोफत
· व्हिसा व्यापार डीआय डेबिट कार्ड
डेबिट कार्डवर खास ऑफर्स :
या सणासुदीमध्ये बँकेने डेबिट कार्डसाठी विविध आकर्षक सवलती आणल्या आहेत. बॅकेने ट्रॅव्हल, फूड, फॅशन, ग्रोसरी आदी क्षेत्रांतील प्रमुख ब्रँड्ससोबत करार केले आहेत.
बॉब डिजी उद्यम – एमएसईंसाठी कॅश फ्लो आधारित डिजिटल कर्ज योजना :
बॉब डिजी उद्योग ही एक डिजिटल व तारणमुक्त कर्जव्यवस्था आहे. सूक्ष्म व लघुउद्योजकांना (एमएसई) या योजनेतून १० लाखांपासून ५० लाखांपर्यंतचे कर्ज खेळत्या भांडवलासाठी त्वरीत मिळते.
· आकर्षक व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कावर सवलत
· सीजीटीएमएसई गॅरंटी कव्हर
· १०० टक्के डिजिटल व कागदविरहित प्रक्रिया
· जलद मंजुरी व पारदर्शक अटी
बॉब प्रॉपर्टी प्राईड – मालमत्तेवर ओव्हरड्राफ्ट सुविधा :
· मासिक स्टॉक स्टेटमेंटची गरज नाही (फक्त वर्षातून एकदाच सादर करण्याची मुभा)
· २५ कोटींपर्यंतचे कर्ज – वयोमर्यादा ७५ वर्षांपर्यंत
· बीआरएलएलआर / एमसीएलआर यांच्याशी संलग्न आकर्षक व्याजदर
· १० टक्क्यांपर्यंत कमी मार्जिन व सवलतीचे शुल्क
· लवचिक ओव्हरड्राफ्ट पर्याय उपलब्ध
ग्राहकांच्या जास्तीत जास्त सोयीसाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोच सुनिश्चित करण्यासाठी या सर्व सणासुदीच्या ऑफर्स बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तसेच बॅंकेच्या देशभरातील शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
*नियम व अटी लागू


