७० टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स तसेच अॅप इन्स्टॉल्स श्रेणी ३ व श्रेणी ४ शहरांतून; पुन्हा-पुन्हा खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे विक्रीला चालना
सणासुदीच्या धामधुमीत मिलेनिअल्स आणि जेन झेड आघाडीवर
गृहोपयोगी वस्तू, मेन्स फॅशन आणि पादत्राणांच्या प्रवर्गांमध्ये विक्रमी वाढ
स्थानिक व्यवसायांना सक्षम करण्यासाठी विक्रेता बक्षीस कार्यक्रम सुरू
देशभरातील कुटुंबं सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत असतानाच, शॉप्सी बाय फ्लिपकार्टच्या ‘ग्रॅण्ड शॉप्सी मेला’दरम्यान मूल्याधारित खरेदीत झालेल्या तुफान वाढीमुळे उत्सवाची पार्श्वभूमी उत्तम तयार झाली आहे. ७० टक्क्याहून अधिक अॅप इन्स्टॉल्स आणि ऑर्डर्स या श्रेणी ३ आणि श्रेणी ४ शहरांतून झाल्यामुळे परवडण्याजोगी व दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची इच्छा भारतात वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. विशेषत: मिलेनिअल्स आणि जेन झेड ग्राहकांमुळे गृहोपयोगी वस्तू, मेन्स फॅशन आणि पादत्राणे या प्रवर्गांतील खरेदीला चालना मिळाली. सेल कालावधीदरम्यान पुन्हा-पुन्हा खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये (रिपीट बायर्स) ४४ टक्के वाढ झाल्याची नोंद शॉप्सीने केली आहे.
सणासुदीचा काळ तोंडावर आला असताना कुटुंबांना सणासुदीच्या काळात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची क्षमता ‘ग्रॅण्ड शॉप्सी मेला’ने दिली. मूल्याबाबत जागरूक असलेले ग्राहक शॉप्सीच्या १,३०० प्रवर्गांमधील १४९ रुपयांहून कमी किमतीच्या १ कोटींहून अधिक विस्तृत उत्पादन श्रेणीचा लाभ किती उत्साहाने घेतात हे दमदार विक्रीतून स्पष्ट झाले. दुर्गापूजेसाठी लागणाऱ्या उत्सवी कुडत्यांपासून दिवाळीनिमित्त घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंपर्यंत, भारतीय कुटुंबाच्या वैविध्यपूर्ण गरजांचा अंदाज शॉप्सीने बांधला आणि त्यानुसार सांस्कृतिक साजरीकरणासाठी तसेच खरेदीचा अखंड अनुभव ग्राहकांना देण्यासाठी खास उत्सवी कलेक्शन्स तयार केली. त्यामुळे भारतभरातील मूल्याबाबत जागरूक ग्राहकांचा ‘गो-टू’ प्लॅटफॉर्म हे शॉप्सीचे स्थान अधिक भक्कम झाले.
शॉप्सी आणि फ्लिपकार्ट मार्केटप्लेसचे उपाध्यक्ष कपिल थिरानी म्हणाले, “ग्रॅण्ड शॉप्सी मेलाच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांसाठी सणासुदीचा काळ लवकर सुरू करून देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे होते. या वर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे शॉप्सीसाठी नवीन मापदंड स्थापित झाला आहे, पैशाचा पुरेपूर मोबदला देणे, दर्जेदार वस्तूंमधून निवडीचा वाव देणे आणि डिजिटल साधने स्थानिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणे यांवर आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित करत असल्याचे यातून दिसून येते. सर्व प्रमुख प्रवर्गांमध्ये दोन आकडी वाढ झाल्यामुळे तसेच पूर्वी सेवा न देता आलेल्या शहरांमध्ये विक्रमी पद्धतीने पोहोचता आल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. ई-कॉमर्स जास्तीत-जास्त लोकांच्या आवाक्यात आणणे, पोहोच अधिक विस्तारणे, स्थानिक उद्योजकांना सक्षम करणे आणि प्रत्येक भारतीय कुटुंबाला अपवादात्मक मूल्य देणे यांप्रती शॉप्सी कायमच बांधील आहे.”
गृहोपयोगी वस्तू, मेन्सवेअर आणि फूटवेअर सणासुदीच्या खरेदीत आघाडीवर
या सेलदरम्यान घरासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली, या वस्तूंच्या मागणीत १०८ टक्के वाढ झाली, तर पुरुषांचे कॅज्युअल वेअर व पादत्राणे यांच्या खरेदीत ९५ टक्के वाढ झाली. स्त्रियांचे कुर्ता अँड पँट सेट्स तसेच इअरबड्स आणि पुरुषांची अनालॉग घड्याळे ही सर्वाधिक विक्री झालेली उत्पादने ठरली. आगामी सणासुदीच्या काळासाठी सज्ज होत असताना मूल्यावर आधारित खरेदीमध्ये शॉप्सीला मिळणारा प्रतिसाद यातून दिसून येतो.
युवा भारत, स्थानिक विक्रेते यांच्याकडून ई-कॉमर्सच्या घोडदौडीला चालना
या वर्षी ग्रॅण्ड शॉप्सी मेलाच्या वाढीला चालना दिली ती तरुण खरेदीदारांच्या लाटेने. यांत मिलेनिअल्स (४८ टक्के) आणि जेन झेड (३२ टक्के) या दोन्ही वर्गांचे प्रमाण एकंदर ग्राहकांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक होते. यातून भारताच्या डिजिटल केंद्री ग्राहकांशी प्लॅटफॉर्मचे घट्ट नाते अधोरेखित होते. जेन झेड ग्राहकांचा भर प्रामुख्याने पर्सनल ग्रूमिंग, फॅशन व तयार कपडे या प्रवर्गांवर होता, तर मिलेनिअल्सची पसंती होम इसेन्शिअल्स आणि फॅशन या प्रवर्गांना होती. या प्रवर्गाच्या विक्रीमध्ये या वर्गांचे योगदान तब्बल ६० टक्के होते. भारताच्या खरेदीबाबतच्या निवडींना आकार देण्यातील स्त्री ग्राहकांचा प्रभावही पुन्हा एकदा अधोरेखित झाला, एकूण ऑर्डर्सच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग ५७ टक्के होता.
विक्रेत्यांना सक्षम करण्याच्या बांधिलकीचा भाग म्हणून शॉप्सीने भारतभरातील नवीन स्थानिक विक्रेत्यांना यशस्वीरित्या सहभागी करून घेतले तसेच विक्रेत्यांना सणासुदीच्या काळासाठी शिक्षित करण्याचे कामही सातत्याने सुरू ठेवले, जेणेकरून चढ्या मागणीचा लाभ घेण्यासाठी ते पूर्णपणे सुसज्ज राहावेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेण्याचा उत्साह आणखी वाढवत शॉप्सीने सेलर रिवॉर्ड्स प्रोग्राम सुरू केला. शॉप्सीच्या सर्व प्रवर्गांमध्ये सर्वाधिक ऑर्डर्स पूर्ण करणाऱ्या आघाडीच्या विक्रेत्यांना बक्षीस देण्यासाठी आणि त्यायोगे सणासुदीचा काळ यशस्वी करण्याच्या दृष्टीने विक्रेत्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे.
भारतातील डिजिटल खरेदीचे क्षेत्र खोलवर पोहोचले
ग्रॅण्ड शॉप्सी मेलादरम्यान ७० टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स यापूर्वी फारशी सेवा न दिल्या गेलेल्या शहरांतून आल्या, कारण शॉप्सीने आपल्या कक्षांचा विस्तार अनेक नवीन प्रदेशांपर्यंत केला. अंबेजोगाई (महाराष्ट्र), श्यामपूर (पश्चिम बंगाल) गौचर (उत्तराखंड), फेकामारी (आसाम), बिलासपूर (हिमाचलप्रदेश) अशा अनेक शहरांमध्ये यंदा शॉप्सीने सेवा दिली. बेंगळुरू, कोलकाता, नवी दिल्ली आणि हैदराबाद या महानगरांमधील व्यवहारांमध्येही वाढ झाली, त्याला श्रेणी २ ते श्रेणी ४ शहरांमधील लक्षणीय वाढीची जोड मिळाली. ५०.९ टक्के खरेदी श्रेणी ३ व ४ शहरांमधून झाली तर ५६.३ टक्के खरेदी श्रेणी २ शहरांमधून झाली. या आकडेवारीतून शॉप्सीचा ठसा भारतात खोलवर जाऊ लागल्याचे स्पष्ट होते.
संपूर्ण सणासुदीच्या काळात शॉप्सी सर्व प्रवर्गांमध्ये परवडण्याजोगी तसेच विचारपूर्वक विकसित केलेली उत्पादने देऊन ग्राहकांना आनंद देण्याचे काम काय
म राखणार आहे.


