Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महालक्ष्मी मंदिर च्या वतीने नवरात्रोत्सवात 'आरोग्यजागर'* सलग ११ दिवस मोफत...

श्री महालक्ष्मी मंदिर च्या वतीने नवरात्रोत्सवात ‘आरोग्यजागर’* सलग ११ दिवस मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन ; आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून ट्रस्टचे कार्य 

 

 

पुणे : नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने ‘आरोग्यजागर’ देखील करण्यात येत आहे. दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सलग ११ दिवस मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये स्त्री रोग, दंत रोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सा, नेत्ररोग, त्वचारोग, जनरल मेडिसिन अशा अनेक तपासण्या करून उपचार केले जात आहेत. पुढील काळात निदानात एखादी शस्त्र क्रियेची गरजेनुसार पण अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

मंदिराच्या शेजारच्या बाजूस अश्विनी क्लिनिक येथे हे शिबीर दररोज सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ यावेळेत सुरु राहणार आहे. संजीवनी हॉस्पिटल, सिल्वर बर्च हॉस्पिटल, युगल कन्स्ट्रक्शन यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील संस्थानी यामध्ये सहभाग घेतला आहे. या शिबिरात प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांची तपासणी केली जात आहे. तसेच रूग्णांना ताप, सर्दी, खोकला, रक्तवाढ, व्हिटॅमिन, अंगदुखी, प्रतिजैविकांवर मोफत गोळ्या, औषधे दिली जात आहे. त्याचप्रमाणे रूग्णांना आवश्यक शस्त्रक्रियेकरिता योग्य समुपदेशन केले जात आहे.

 

विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून ट्रस्ट कार्यरत असून शिबिराच्या माध्यमातून आरोग्य चिकित्सा व समुपदेशनाची सेवा मोफत स्वरूपात पुरवली जात आहे. देवीच्या दर्शनासोबत आरोग्य शिबिरात मिळणाऱ्या उत्तम पद्धतीच्या सुविधांमुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना आहे. तरी, जास्तीत जास्त भाविकांनी या रूग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments