प्रवासी आता 115+ स्थानकांवरून प्रवास करताना स्विगी अॅपवर ‘सिटी बेस्ट’ जेवणाची ऑर्डर देऊ शकतात
ट्रेनमधील जेवणाचा त्रासमुक्त अनुभव मिळावा म्हणून ‘ईझी ईट्स’ची सुरूवात
ट्रेनवरील जेवणाच्या ऑर्डरवर सर्वोत्तम ऑफर्ससाठी नव्या ‘ऑफर झोन’ची सुरूवात
या नवरात्रीसाठी शाकाहारी आणि उपवास करणाऱ्यांसाठी ‘प्युअर व्हेज’ विभाग सुरू
बेंगळुरू, 30 सप्टेंबर 2025 : स्विगी (स्विगी लिमिटेड, एनएसई: SWIGGY / बीएसई: 544285), भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड कंविनियन्स प्लॅटफॉर्म, यांनी आज त्यांच्या ‘फूड ऑन ट्रेन’ सेवेसाठी अनेक नवी वैशिष्ट्ये सुरू केल्याची घोषणा केली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, स्विगीने आणखी स्मार्ट आणि वैयक्तिक आवडीप्रमाणे मेन्यू पर्याय सादर केले आहेत, ज्यामुळे भारतभरातील लाखो रेल्वे प्रवाशांना एक नवा पाककला अनुभव मिळणार आहे. प्रवासी आता विविध ‘सिटी बेस्ट’ डिशेसचा आस्वाद घेऊ शकतात, ज्यात प्रत्येक स्थानकावरील प्रसिद्ध खाद्यगृहांची खास निवड केलेली आहे. याशिवाय, स्विगीने ‘ईझी ईट्स’चीही सुरूवात केली असून यात ट्रेनमधील त्रासमुक्त जेवणाचा अनुभव मिळतो. ‘ईझी ईट्स’ची निवड खासकरून ट्रेन प्रवास लक्षात घेऊन करण्यात आली आहे, हेल्दी निबल्स जसे की सॅलड्सपासून ते मजेदार मन्चीज जसे की फ्राईज आणि नाचोजपर्यंत, ही सर्व जेवणे नीटनेटके आणि सोयीस्कर पॅकेजिंगमध्ये, तसेच आवश्यक कटलरी किटसह दिली जातील.
याशिवाय, स्विगीने शाकाहारी अन्न पसंत करणाऱ्यांसाठी किंवा नवरात्रीत उपवास करणाऱ्यांसाठी खास ‘प्युअर व्हेज’ विभाग सुरू केला आहे. या नव्या सुविधेमुळे चविष्ट आणि विश्वासार्ह 100% शाकाहारी जेवण शोधणे सोपे झाले आहे. एवढंच नाही. या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांना स्विगीच्या ‘ऑफर झोन’मार्फत त्यांच्या फूड ऑन ट्रेन ऑर्डर्सवर जबरदस्त बचत करता येणार आहे. या विशेष विभागामध्ये प्रवाशांना कोणत्याही स्थानकावर त्वरित 30+ सर्वोत्तम डील्स मिळणार आहेत, ज्यात आघाडीच्या रेस्टॉरंट्समध्ये 60% पर्यंत सूटही आहे, त्यामुळे स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत बचत करणे सोपे झाले आहे.
या सणासुदीच्या हंगामात रेल्वे प्रवासी 5000 पेक्षा जास्त पदार्थांमधून आपले आवडते जेवण निवडू शकतात आणि ते थेट त्यांच्या रेल्वेच्या सीटवर, 115+ स्थानकांवर डिलिव्हरी करून घेऊ शकतात! अहमदाबादमध्ये पारंपरिक थाळी असो किंवा पश्चिम बंगालमधील स्वादिष्ट सीफूड करी, आम्ही भारतातील स्थानिक चवींचा सर्वोत्तम अनुभव थेट प्रवाशांच्या सीटपर्यंत पोहोचवत आहोत.
सणासुदीच्या हंगामात सुरू केलेल्या नव्या वैशिष्ट्यांवर बोलताना स्विगीचे फूड स्ट्रॅटेजी, कस्टमर एक्स्पीरियन्स आणि न्यू इनिशिएटिव्ह्जचे उपाध्यक्ष श्री. दीपक मालू म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांच्या अपेक्षा ऐकल्या आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आता आम्ही आणखी स्मार्ट आणि वैयक्तिक आवडीनुसार जेवणाचे पर्याय आणत आहोत, जे प्रत्येक प्रवासाला स्वादिष्ट, सोयीस्कर आणि खरोखर खास बनवतील. ‘सिटी बेस्ट’मुळे ऑर्डर करताना काय निवडावे याचा ताण नाहीसा होतो आणि प्रवाशांना सहजपणे विश्वासार्ह, उच्च दर्जाचे पर्याय मिळतात, जे उत्कृष्ट चव, स्वच्छता आणि भरपूर प्रमाणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंट पार्टनर्सकडून मिळतात. त्याचप्रमाणे ‘ईझी ईट्स’मुळे प्रवासादरम्यान अस्वच्छ आणि गैरसोयीच्या जेवणाचा प्रश्न सुटतो, तर ‘प्युअर व्हेज’ विभागामुळे शाकाहारी प्रवाशांना समाधान मिळेल. थोडक्यात, आम्ही ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जे आपण सर्व जाणतो : प्रवासही गंतव्याइतकाच महत्त्वाचा आहे!”
क्युरेटेड निवड, विश्वासार्ह गुणवत्ता आणि अखंड तंत्रज्ञान यांचा संगम करून स्विगी ग्राहकांना प्रवासातसुद्धा योग्य निवड करून जलद ऑर्डर देण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे अन्न शोधणे अधिक सोपे आणि आनंददायी झाले असून, वापरकर्ते आता 25% अधिक वेगाने ऑर्डर देऊ शकतील. स्विगीचे अद्ययावत ‘फूड ऑन ट्रेन’ पेज वेगासाठी तयार करण्यात आले आहे आणि ते कमकुवत इंटरनेट कनेक्शनवरही सुरळीत चालते.
भारताच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दररोज सुमारे 16 लाख आरक्षित प्रवासी प्रवास करतात. बहुतांश प्रवाशांसाठी जेवणाचे पर्याय वर्षानुवर्षे पँट्री कारमधील अन्न किंवा स्थानकावरील स्टॉलवर उपलब्ध असलेल्या पदार्थांपुरते मर्यादित राहिले आहेत, जे अनेकदा स्वच्छता, विविधता आणि सोयीच्या दृष्टीने कमी पडतात. या तुटवड्याची भरपाई करण्यासाठी स्विगीची ‘फूड ऑन ट्रेन’ सेवा पुढे आली आहे, जी विश्वासार्ह स्थानिक रेस्टॉरंट पार्टनर्सकडून गरमागरम जेवण थेट रेल्वेच्या सीटवर, 115+ स्थानकांवर
डिलिव्हर करते.


