राष्ट्रीय, ३ ऑक्टोबर २०२५: कोका-कोला इंडिया आणि इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित क्रीडा इव्हेण्ट ‘विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया २०२५’मध्ये अद्वितीय उत्साहाची भर करण्यास सज्ज आहेत. हा धोरणात्मक सहयोग त्यांच्या ८ वर्षांच्या भागीदारीवर आधारित आहे, जो क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रेरित करण्याप्रती आणि खेळाडूंच्या भावी पिढीला सक्षम करणाऱ्या संधी निर्माण करण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.
अधिकृत बेव्हरेज पार्टनर म्हणून थम्स अप एक्सफोर्स आणि हायड्रेशन पार्टनर म्हणून बॉडीआर्मर लाइट ओआरएस यांच्यासह कोका-कोला इंडिया संपूर्ण आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ दरम्यान खेळाडूंना व चाहत्यांना उत्साहित व रिफ्रेश ठेवेल. आपल्या प्रबळ क्रीडा वारसाशी संलग्न असलेली कोका-कोला इंडिया गुवाहाटी, इंदौर, विजाग व नवी मुंबई येथे या स्पर्धेचे यजमानी भारताला प्रशंसित करेल, तसेच खात्री घेईल की प्रत्येक सामन्यामधून साहसी उत्साह, आनंद व एकजूटता दिसून येईल. कोका-कोला इंडिया आपल्या पेयांचा संपूर्ण पोर्टफोलिओ देईल, ज्यामधून प्रत्येकाला सामन्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध असण्याची खात्री मिळेल.
आयसीसी स्पर्धा, ऑलिम्पिक्स व पॅरालिम्पिक्सदरम्यान ‘थम्स अप उठा, इंडिया इंडिया मचा’, #PalatDe, #TaanePalatDe आणि ‘उठा थम्स अप, जगा तूफान’ अशा मोहिमांच्या माध्यमातून खेळाडूंना सक्षम करण्याचा आपला वारसा अधिक दृढ करत थम्स अपने दीर्घकाळापासून क्रीडा उत्साहाला साजरे केले आहे. आता, नवीन नो-शुगर बेव्हरेज थम्स अप एक्सफोर्ससह ब्रँड त्याच धाडसी वृत्तीसह या वारसाला पुढे घेऊन जात आहे. याला पूरक म्हणून कोका-कोलाचे स्पोर्ट्स ड्रिंक बॉडीआर्मर लाइट ओआरएसने आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ मध्ये खेळाडूंना व चाहत्यांना प्रगत हायड्रेशन देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.
कोका-कोला इंडियाचे उापाध्यक्ष सुंदीप बजोरिया म्हणाले, ”कोका-कोला इंडिया देशभरातील वितरण नेटवर्कच्या माध्यमातून अधिक प्रमाणात रिफ्रेशमेंट देण्याप्रती अद्वितीयरित्या स्थित आहे, तसेच प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे, जेथे क्रिकेट साजरे केले जाते. आमच्यासाठी आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या सहयोगी व रिटेलर्ससाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी संधी आहे. लाखो चाहते व खेळाडूंसाठी आमचा पोर्टफोलिओ सादर करत आम्ही मैदानावर खेळाला पाठिंबा देत आहोत, तसेच उत्साहवर्धक क्षण देखील निर्माण करत आहोत, जे क्रिकेटला देशभरात शेअर केला जाणारा अनुभव बनवतात.”
कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट आशियाचे आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पेरिअन्स) प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”भारतात महिला क्रीडा महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे, नवीन खेळाडूंचे लक्ष वेधून घेत आहे आणि भावी पिढीच्या क्रिकेटचा अनुभव घेण्याच्या पद्धतीला आकार देत आहे. भारतात कोका-कोलामध्ये आमचे या सांस्कृतिक परिवर्तनाचे प्रमुख असण्याचे धोरण आहे, ज्यासाठी आम्ही ग्राहकांशी दृढपणे संलग्न होणारे अनुभव निर्माण करत आहोत. थम्स अप एक्सफोर्स आणि बॉडीआर्मर लाइट ओआरएस पूरक ताकद देतात, जी साहसी ओळख व वारसामध्ये, तसेच अत्याधुनिक हायड्रेशनमध्ये सामावलेली आहे. एकत्रित, ते आम्हाला चाहत्यांसोबत फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर सहभागी म्हणून मोठ्या क्षणामध्ये संलग्न होण्याची सुविधा देतात, जेथे क्रीडा, संस्कृती व ब्रँड्स एकत्र येतात.”
भारत आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ चे यजमानपद भूषवण्यास सज्ज असताना कोका-कोला इंडिया प्रेरित करणाऱ्या व एकत्र आणणाऱ्या खेळाला अधिक निपुण करण्याचा आपला वारसा दृढ करत आहे. ऑलिम्पिक्स व पॅरालिम्पिक्सपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचापर्यंत कंपनीने सतत क्रीडा उत्कृष्टतेला साजरे केले आहे. आयसीसीसोबत या विस्तारित सहयोगाच्या माध्यमातून कोका-कोला इंडिया खात्री घेते की प्रत्येक सीमा, उत्साह व साजरीकरण उद्देशाशी संलग्न असेल, ज्यासह चाहत्यांना उत्साहवर्धक अनुभव मिळण्यासाठी नवीन मापदंड स्थापि
त होईल.


