Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे बाईक रॅली

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे बाईक रॅली

पुणे, २९ ऑगस्ट २०२६ : अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्यातील नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे उपव्यवस्थापकीय संचालाक डॉ. दिवीज माने, समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे, आर.जे संग्राम खोपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात आला. नोबल हॉस्पिटल्स, पुणे येथून सुरू झालेली ही रॅली मगरपट्टा सिटी – अमनोरा टाउनशिप – माळवाडी – गाडीतळ, हडपसर या मार्गाने जाऊन पुन्हा नोबल हॉस्पिटल्स येथे परतली. एकूण १२ किलोमीटर अंतराच्या या रॅलीमध्ये 200 हुन अधिक बायकर्स नी सहभाग घेतला. सहभागी बाईकस्वारांनी शहरातून प्रवास करताना अवयवदानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.

अलीकडेच अवयवदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृती कार्यक्रमानंतर हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयवदानामुळे जीवनाची नवी संधी मिळू शकते, याबाबत जनजागृती वाढविण्याच्या नोबल हॉस्पिटल्सच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे उपव्यवस्थापकीय संचालक, डॉ. दिविज माने, म्हणाले की या रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश हॉस्पिटल पुरता मर्यादित न ठेवता तो समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. एका अवयवदात्याच्या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते. अधिकाधिक कुटुंबांनी अवयवदानाबाबत चर्चा करावी, त्याचे महत्त्व समजून घ्यावे आणि या जीवनदायी कार्यासाठी पुढे यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे म्हणाले की अवयवदान वाढविण्यासाठी जनजागृती हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा या रॅलीद्वारे प्रयत्न करण्यात आला. अवयवदानाबाबत जागरूकता वाढविणे, नागरिकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि कुटुंबांमध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक संवाद घडवून आणणे, या उद्देशाने नोबल हॉस्पिटल्सतर्फे विविध जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमाला द बायकरणी यांचा पाठिंबा मिळाला. द बायकरणी च्या सहसंस्थापक उर्वशी पाटोळे म्हणाल्या, “बायकर्स म्हणून आपल्या स्थानिक समुदायांमध्ये आपल्याकडे अनेकदा आपला आवाज आणि समुदायाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे खरोखरच महत्त्वाच्या विषयासाठी या प्रभावाचा उपयोग करण्याची आपल्याला संधी मिळते. अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करून आपण आपल्या कुटुंबांमध्ये आणि समुदायांमध्ये या विषयावर संवाद सुरू करू शकतो. यातून शेवटी अनेकांचे प्राण वाचू शकतात. आज हा संदेश रस्त्यावरून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरला पाठिंबा देताना मला अभिमान वाटतो.”

मिशन सेफर रोड्सचे संस्थापक कल्याणरामन व्यंकटेशन म्हणाले, “अवयवदान ही अशी एक चळवळ आहे, जी एखाद्या व्यक्तीला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकते. या विषयावर अधिक संवाद आणि जनजागृती होण्याची गरज आहे, असे मला वाटते. बायकर्स म्हणून आमचा एक मजबूत समुदाय आणि प्रभावी व्यासपीठ आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमणसाठी आम्ही नेहमीच एकत्र येण्यास तयार असतो. आज या व्यासपीठाचा उपयोग करून अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न होता. अशा महत्वपूर्ण कारणासाठी बायकिंग समुदाय एकत्र येताना पाहून मला अभिमान वाटतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments