Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedउबरतर्फे मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथे इंटरसिटी मोटरहोम्स पायलटचा विस्तार

उबरतर्फे मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथे इंटरसिटी मोटरहोम्स पायलटचा विस्तार

दिल्लीतील नव्या इंटरसिटी ट्रॅव्हल ऑफरिंगला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर होणार लिमिटेड एडिशन पायलटचा विस्तार अधिक शहरांमध्ये

 

 

बंगळुरू, ऑक्टोबर 9, 2025: दिल्ली एनसीआरमध्ये अत्यंत यशस्वी अंमलबजावणी नंतर उबरने आज आपल्या लिमिटेड-एडिशन इंटरसिटी मोटरहोम्स मोहिमेचा विस्तार मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथे करण्याची घोषणा केली. या ऑफरिंगद्वारे रायडर्सना आउटस्टेशन (परगावी) रोड ट्रिपसाठी कस्टम-डिझाइन केलेल्या, कॅराव्हॅन-स्टाईल मोटरहोम्स बुक करता येतात. ही सेवा दिल्ली एनसीआरमध्येही 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.

 

 

 

मुंबई, बंगळुरू आणि पुणे येथील रायडर्सना 15 ऑक्टोबरपासून इंटरसिटी मोटरहोम ट्रिप्स बुक करता येतील आणि बुकिंग 13 ऑक्टोबरपासून सुरू होतील. दिल्ली-एनसीआरमध्ये आधीपासूनच याची बुकिंग सुरू आहेत.

 

 

 

उबर इंटरसिटीद्वारे आउटस्टेशन ट्रॅव्हलला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या मोटरहोम्स मोहिमेला आरामदायक आणि खाजगी प्रवासाच्या अनुभवाची इच्छा असलेल्या रायडर्सकडून अतुलनीय प्रतिसाद मिळाला. मॉन्सून ट्रॅव्हल सीझनदरम्यान राष्ट्रीय राजधानीमध्ये झालेल्या एका महिन्याच्या पथदर्शी उपक्रमात सर्व दिवस 100% ऑक्युपन्सी होती आणि इतर शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात आली. या मोहिमेच्या विस्तारातून भारतात लवचिक आणि प्रीमियम लांब पल्ल्याच्या रस्ते प्रवास पर्यायांसाठी असलेली वाढती मागणी दिसून येते.

 

 

 

या घोषणेबाबत बोलताना उबर इंडिया आणि साऊथ एशियाच्या कंझ्युमर ग्रोथचे संचालक शिव शैलेंद्रन म्हणाले, “उबर इंटरसिटी हे विश्वासार्ह, आरामदायक आणि शहरांमधील सहज सोप्या प्रवासासाठी रायडर्सच्या पसंतीचा पर्याय बनले आहे. लोक जलद गेटवे, कौटुंबिक गाठीभेटी आणि बिझनेस ट्रिप्ससाठी रस्ते प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे इंटरसिटीच्या वाढत्या लोकप्रियतेतून दिसून येते. आमच्या मोहिमेचे सातत्यपूर्ण यश आणि अधिक शहरांपर्यंत विस्तार यांसह आम्ही इंटरसिटीचे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ‘गो-टू’ पर्याय म्हणून स्थान अधिक मजबूत करत आहोत.”

 

 

 

 

 

ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी भारतात परगावी प्रवास करण्यासाठी सर्वात व्यस्त काळांपैकी एक मानला जातो. सण, लग्नसमारंभ आणि आल्हाददायक शरद ऋतू व हिवाळ्याच्या हवामानामुळे हा काळ एकदम अनुकूल असतो. थंड तापमान आणि स्वच्छ आकाश यामुळे हा काळ वीकेंड गेटवे आणि रोड ट्रिपसाठी आदर्श ठरतो, तर सुट्टीमुळे कुटुंबे आणि मित्रांना परगावीही एकत्र आणतो. या काळात नेहमीच आरामदायक, लवचिक आणि विश्वासार्ह इंटरसिटी ट्रॅव्हल पर्यायांची मागणी वाढलेली दिसते.

 

 

 

प्रत्येक इंटरसिटी मोटरहोममध्ये टेलिव्हिजन, मायक्रोवेव्ह, मिनी-रेफ्रिजरेटर आणि लॅव्हेटरी सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे रायडर्सना फिरता खाजगी, लाउंजसारखा अनुभव मिळतो. या वाहनांमध्ये 4–5 प्रवाशांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था असते आणि संपूर्ण प्रवासात मदत करण्यासाठी एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर असतो.

 

 

 

इतर सर्व उबर इंटरसिटी रायड्सप्रमाणेच, मोटरहोम ट्रिप्सदेखील रिझर्व्ह द्वारे आधीच बुक करता येतात. प्रवासादरम्यान मधले थांबे वाढविण्याची, रिअल टाइममध्ये राईड ट्रॅक करण्याची आणि 24×7 लाइव्ह सपोर्टची सुविधा उपलब्ध असते. वाढत्या मागणीमुळे, इंटरसिटी मोटरहोम्स नियोजित प्रवासाच्या किमान 48 तास आधी बुक करणे आवश्यक आहे.

 

 

 

आज उबर इंटरसिटी भारतातील सर्वात मोठे संघटित आउटस्टेशन मोबिलिटी प्रॉडक्ट (शहरां-शहरांत दळणवळण साधन)म्हणून उभे असून देशभरातील 3,000 हून अधिक मार्गांवर प्रवाशांना जोडते. अॅप-आधारित प्रवासाची विश्वासार्हता आणि लांब पल्ल्याच्या रस्ते प्रवासाची लवचिकता एकत्र आणून इंटरसिटीने पारंपरिक टॅक्सी ऑपरेटर्स आणि असंघटित प्रवास पर्यायांसाठी एक विश्वसनीय पर्याय निर्माण केला आहे.

 

 

 

मोटरहोम्ससारख्या नाविन्यपूर्ण मोहिमांच्या पाठबळावर इंटरसिटीच्या सातत्यपूर्ण विस्तारातून भारतातील परगावी प्रवासाचे भवितव्य अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि आरामदायक बनवण्याची उबरची बांधिलकी दिसून येते. उबरची तंत्रज्ञान क्षमता लांब पल्ल्याच्या रस्ते प्रवासाला अधिक लवचिक, आरामदायक आणि आनंददायक कशी बनवू शकते हे इंटरसिटी मोटरहोम्स मोहीमेतून ठळकपणे दिसून येते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments