पुणे, ११ ऑक्टोबर,
बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेची अभ्यासपूर्ण चिकित्सा करून त्यावर अतिशय योग्य व व्यवहार्य उपाय सुचविणारे श्री विवेक काशीकर (पुणे) लिखित *बलात्कार एक अटळ वास्तव* हे पुस्तक पुण्याच्या साहित्यविश्व प्रकाशनतर्फे रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे, येथे दुपारी ४.३० वाजता प्रकाशित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा पुरव सामंत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिजित वैद्य हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. तसेच कामगार संघटनेच्या नेत्या कॉ. मुक्ता मनोहर या विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बलात्कारासारख्या घटनेबद्दल घृणा वाटणाऱ्या आणि या विषयावर रचनात्मक पद्धतीने काम करू पाहणाऱ्या तसेच सर्वच संवेदनशील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्ताने साहित्यविश्व प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे.