Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळी पाडव्यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीला ५६ प्रकारचा भोग श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग...

दिवाळी पाडव्यानिमित्त श्री महालक्ष्मी देवीला ५६ प्रकारचा भोग श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे ; मंदिरात भव्य अन्नकोट व आकर्षक सजावट

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारची मिठाई, फरसाण, चिवडा, फळे यांसह ५६ प्रकारच्या मिष्टांन्नांचा भोग श्री महालक्ष्मी देवीसमोर लावण्यात आला. दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.

 

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा, निलेश लद््दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदी यावेळी उपस्थित होते.

 

लक्ष्मीपूजनानिमित्त श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. त्याचे दर्शन घेण्याकरिता देखील देवीभक्तांनी मोठी गर्दी केली होती. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. तर, पाडव्याला अन्नकोट आयोजित केला जातो. महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments