Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedगॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने सादर केला भारतातील पहिला 48V Li-ion इलेक्ट्रिक हँड पॅलेट...

गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने सादर केला भारतातील पहिला 48V Li-ion इलेक्ट्रिक हँड पॅलेट ट्रक

उच्च कार्यक्षमतेचा इलेक्ट्रिक हँड पॅलेट ट्रक ई-कॉमर्स आणि रिटेल क्षेत्रासाठी गोदामातील कामकाज अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत करणार ~

 

मुंबई, 24 ऑक्टोबर 2025 : गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट व्यवसायाने आज भारतातील पहिला 48V Li-ion इलेक्ट्रिक हँड पॅलेट ट्रक – GEPT 20 लाँच केल्याची घोषणा केली. ही वेअरहाऊस मोबिलिटी आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने एक मोठी झेप मानली जात आहे. सध्या भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात ऑर्डर्सच्या प्रमाणात मोठी वाढ होत असून, वेगवान आणि सुरक्षित ऑपरेशन्सची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर GEPT 20 हा भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या वेअरहाऊसिंग क्षेत्रासाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. हा ट्रक पारंपरिक हँड पॅलेट ट्रक्सच्या तुलनेत तिप्पट जास्त उत्पादकता देतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे फास्ट लिफ्टिंग, जास्त रनटाईम, प्रिसाईज कंट्रोल आणि दमदार टिकाऊपणा.

 

एका चार्जवर 4 तासांहून अधिक रनटाईम मिळणारा हा ट्रक सहजपणे 2 टनांपर्यंतचा भार उचलू शकतो. तसेच यामध्ये दिलेला टर्टल स्पीड मोड गर्दीच्या जागेत सुरक्षितपणे हालचाल करण्यास मदत करतो. त्यामुळे तो आधुनिक वेअरहाऊस, रिटेल बॅकरूम्स आणि औद्योगिक सुविधांसाठी आदर्श ठरतो.

 

अनिल लिंगायत, बिझनेस हेड, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट बिझनेस, गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुप यांनी लाँचिंगवेळी सांगितले : “गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये आम्ही इनोव्हेशन, कार्यक्षमता आणि टिकाऊपणाच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक क्षेत्रात परिवर्तन घडवण्याच्या ध्येयाने कार्य करतो. GEPT 20 हे केवळ एक प्रॉडक्ट लाँच नसून लॉजिस्टिक्सचे विद्युतीकरण करण्याचा आणि उद्योगांना अधिक स्मार्ट व स्वच्छ तंत्रज्ञानाने सक्षम बनवण्याचा धोरणात्मक टप्पा आहे. भारतातील पहिला 48V Li-ion इलेक्ट्रिक हँड पॅलेट ट्रक सादर करून आम्ही उत्पादकता वाढवणारे, भविष्याभिमुख सोल्यूशन्स तयार करण्याची आणि देशाच्या हरित व आत्मनिर्भर विकासकथेत योगदान देण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करत आहोत.”

 

आधुनिक Li-ion बॅटरी तंत्रज्ञानामुळे GEPT 20 ला फास्ट चार्जिंग, शून्य देखभाल आणि जास्त आयुष्यकाल मिळतो, ज्यामुळे तो पारंपरिक पर्यायांपेक्षा खूपच प्रगत आहे. हे लाँचिंग गॉदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सस्टेनेबल इनोव्हेशनच्या ध्येयाशी सुसंगत असून, पुरवठा साखळीचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासोबतच भारताच्या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग इकोसिस्टमला सक्षम बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

 

मॅन्युफॅक्चरिंग, ई-कॉमर्स, रिटेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या उद्योगांना वाढत्या देशांतर्गत व जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी वेगाने विस्तार करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, GEPT 20 सारखी सोल्यूशन्स वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. हे पाऊल देशाच्या भविष्यातील ग्रीन लॉजिस्टिक्स उभारणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments