Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedमानसिक आरोग्य चिकित्सा तज्ञ डॉ.शीतल हरपळे यांना रायझिंग क्लिनिशियन ॲवॉर्ड 2025 *...

मानसिक आरोग्य चिकित्सा तज्ञ डॉ.शीतल हरपळे यांना रायझिंग क्लिनिशियन ॲवॉर्ड 2025 * द अमेरिकन आर्ट थेरपी असोसिएशन (एएटीए) चा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय आर्ट थेरपीस्ट

पुणे,27 ऑक्टोबर 2025 : नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथील मानसिक आरोग्य चिकित्सक डॉ.शीतल हरपळे यांना पोर्टलँड,ओरेगॉन, युएसए येथे द अमेरिकन आर्ट थेरपी असोसिएशन (एएटीए) तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या 56 व्या वार्षिक परिषदेत रायझिंग क्लिनिशियन ॲवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ.हरपळे या पहिल्या भारतीय आर्ट थेरपीस्ट असून भारतातील आर्ट थेरपी विषयाचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.

 

रायझिंग क्लिनिशियन ॲवॉर्ड हा पुरस्कार अभिनवता,विषयाची सखोलता आणि लोकांवर प्रभाव दर्शविणाऱ्या चिकित्सकांना प्रदान करण्यात येतो. डॉ.हरपळे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराच्या फलकावर ‘सर्व्हज्‌‍ ॲज अ मॉडेल ऑफ एक्सलन्स इन आर्ट थेरपी’ असे लिहिले गेले असून सर्जनशील आणि प्रतिसादात्मक उपचारात्मक पध्दतींद्वारे मानसिक आरोग्याप्रती त्यांच्या समर्पित प्रयत्नांची दखल घेतो.

 

डॉ.शीतल हरपळे म्हणाल्या की, रायझिंग क्लिनिशियन ॲवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय म्हणून मला आनंद आहे.या प्रवासात माझी साथ देणारे माझे मार्गदर्शक कुटुंबीय तसेच रूग्ण आणि एएटीए चे मी ॠणी आहे.हा फक्त माझ्यासाठी पुरस्कार नसून प्रत्येक भारतीय आर्ट थेरपीस्टसाठी आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्यसेवा प्रणाली,कॉर्पोरेट क्षेत्र,शिक्षण क्षेत्र आणि एकंदर समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असताना आर्ट थेरपीचे महत्त्व वाढत आहे.कुठलाही आघात किंवा आजारानंतर भावनिक स्थिरता किंव समर्थन देण्यात आर्ट थेरपी ही पध्दती स्वीकारली जात आहे.मात्र असे असले तरी यात शास्त्रीयदृष्टया आणखी सखोल संशोधन होण्याची गरज आहे.

 

या सन्मानाबाबत अभिनंदन करताना संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,हे यश वैयक्तिक कामगिरीच्या पलीकडे जाऊन भारतातील आर्ट थेरपीचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.आरोग्य आणि मानसोपचाराच्या जागतिक चौकटींमध्ये भारतीय पध्दतींचा वाढत्या प्रभावाचा हा पुरावा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments