पीबीएमए च्या एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल च्या नूतनिकृत इमारतीचे नुकतेच उदघाटन करण्यात आले . जागतीक दर्जाची नेत्रचिकित्सा प्रदान करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे .
या अद्ययावत सुविधेचे उदघाटन बजाज फिनसर्व्ह च्या सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पीबीएमए च्या एच.व्ही देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, अध्यक्ष राजेश शहा, उपाध्यक्ष सुधीर साबळे व मनीष जैन, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, एच.व्ही देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे, वैद्यकीय संचालक डॉ.सुचेता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कामकाज अधिकारी डॉ.सुशीला कवडे भोसले यांनी केले.
बजाज फिनसर्व्ह च्या सीएसआर उपक्रमांतर्गत समर्थन लाभलेल्या या नव्या सुविधेने नेत्रचिकित्सा क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे . या आधुनिक इमारती मध्ये समुपदेशन कक्ष, सल्ला कक्ष, रीफ्राक्षन युनिट, निदान सेवा, ओपीडी,ऑप्टिकल स्टोअर, फार्मसी व अद्ययावत ऑपरेशन थेटर्स ( शस्त्रक्रिया कक्ष) अशा अनेक सुविधा आहेत. रुग्णांची सोय लक्षात घेऊन डिझाईन केल्या गेलेल्या या इमारतीत प्रतीक्षा कक्ष, डोमच्या आकाराची लॉबी , आधुनिक स्वागत कक्ष आणि रुग्णालयात ये-जा करण्यासाठी सुनियोजीत मार्गिकेचा समावेश आहे .
उदघाटन कार्यक्रमात नितीन देसाई यांनी रुग्णालयाच्या सध्याच्या पायाभूत सुविधा, विविध उपक्रम व भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली.
डॉ. राहुल देशपांडे यांनी सेवा क्षमता विस्तारीत करण्यासाठी पुढील योजनांबाबत तर डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी कौशल्य विकास आणि संशोधन याबाबत माहिती दिली.
पुढील विस्ताराबाबत सांगतांना परवेझ बिलीमोरिया म्हणाले की संस्थेतर्फे पुढील तीन वर्षात पायाभूत सुविधा तिपटीने वाढवणार असून शास्त्रक्रियांची संख्या दुप्पट करण्याचे उद्धिष्ट आहे. हे करत असताना संशोधन आणि पुढील पिढीतील चिकित्सक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम केंद्रस्था
नी असतील.


