Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedबजाज फिन्सर्व्ह म्‍युच्‍युअल फंडने १ दशलक्ष फोलिओचा टप्‍पा पार केला, गुंतवणूकदारांचा विश्वास...

बजाज फिन्सर्व्ह म्‍युच्‍युअल फंडने १ दशलक्ष फोलिओचा टप्‍पा पार केला, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि विकास गतीला अधिक दृढ केले

पुणे, २९ ऑक्‍टोबर २०२५: नाविन्‍यता, शिस्‍तबद्ध गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन मूल्‍य निर्मितीप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत बजाज फिन्सर्व्ह म्‍युच्‍युअल फंडने आपल्‍या प्रवासात महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठला आहे. लाँच झाल्‍यापासून अवघ्‍या दोन वर्षांमध्‍ये आपल्‍या म्‍युच्‍युअल फंड योजनांमध्‍ये १ दशलक्ष गुंतवणूकदार फोलिओचा टप्‍पा गाठला आहे. हे यश बजाज फिनसर्व अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे, वाढत्या गुंतवणूकदार विश्वासाचे आणि वेगळेपण जपणाऱ्या गुंतवणूक उपाययोजनांवर केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.

 

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत बजाज फिन्सर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक गणेश मोहन म्‍हणाले, ”१ दशलक्ष फोलिओचा टप्‍पा गाठणे आमच्‍यासाठी, तसेच आमच्‍या गुंतवणूकदारांसाठी देखील मोठे यश आहे. हे आमच्या गुंतवणूकदार-प्रथम तत्त्वज्ञानावर आणि कार्यप्रदर्शनकेंद्रित गुंतवणूक उपायांवर गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. आम्ही पारदर्शक, संशोधनाधारित गुंतवणूक धोरणे प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेशी ठामपणे जोडलेले आहोत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता साधता येते. मानवी कौशल्‍य व संख्‍यात्‍मक विश्‍लेषणाला एकत्र करत आम्‍ही अचूकतेने बाजारपेठेतील गुंतागूंतींचे निराकरण करतो, तसेच आमच्‍या निर्णयामध्‍ये नेहमी गुंतवणूकदार निष्‍पत्तींना प्राधान्‍य देतो. हा टप्‍पा आम्‍हाला अधिक नाविन्‍यता आणण्‍यास, आमच्‍या ऑफरिंग्‍ज वाढवण्‍यास आणि गुंतवणूकदार समुदायासोबत आमचे संबंध दृढ करण्‍यास प्रेरित करतो.”

 

कंपनीचे धोरण नाविन्‍यता, यशस्‍वी सहयोग आणि डेटा व तंत्रज्ञान प्‍लॅटफॉर्म्‍सचा वापर करून डिझाइन केल्‍या जाणाऱ्या भविष्‍यासाठी सुसज्‍ज व्‍यवसाय मॉडेलवर आधारित आहे. कंपनीच्‍या धोरणाने डिजिटल सक्षमीकरणावर, तसेच व्‍हॉट्सअॅप, एम्‍पॉवर, सेव्हिंग्‍ज+ अशा विविध चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातून गुंतवणूकदारांना विनासायास अनुभव देण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, तसेच विविध भौगालिक प्रदेशांमधील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

बजाज फिन्सर्व्ह एएमसीला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी बाब म्‍हणजे त्‍यांचे गुंतवणूक तत्त्व, जे मालकीचा आराखडा ‘इनक्‍यूब’ अंतर्गत इन्‍फॉर्मेशन एज, क्‍वॉन्टि‍टेटिव्‍ह एज आणि बिहेव्हियरल एज अशा अल्‍फाच्‍या सर्व स्रोतांना एकत्र करण्‍याचा प्रयत्‍न करते.

 

जून २०२३ मध्‍ये पहिली योजना लाँच केल्‍यापासून बजाज फिन्सर्व्ह एएमसीने आकार व व्‍याप्‍तीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, ज्याचे एकूण एयूएम २८,८१४.१६ कोटी रूपये आहे (३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत)*. त्याचवेळी, कंपनी आर्थिक समावेशन आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयावर सातत्याने पुढे वाटचाल करत आहे, गुंतवणूकदारांच्‍या सर्वसमावेशक गरजांनुसार डिझाइन करण्‍यात आलेल्‍या म्‍युच्‍युअल फंड योजनांची वैविध्‍यपूर्ण श्रेणी देत आहे. अल्‍पावधीत फंड हाऊस आधीच १७ सक्रिय योजनांचे (८ इक्विटी, ५ डेब्‍ट व ४ हायब्रिड), तसेच ५ निष्क्रिय योजनांचे व्‍यवस्‍थापन पाहत आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments