Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedवंदे मातरम्' याविषयावर चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन आज (दि.७)*  वंदे...

वंदे मातरम्’ याविषयावर चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन आज (दि.७)*  वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षपूर्ती निमित्त नारद मंदिर संस्था व आफळे अकादमी तर्फे विशेष आयोजन

 

पुणे : वंदे मातरम् च्या १५०व्या वर्षपूर्तीच्या औचित्याने नारद मंदिर संस्था आणि आफळे अकादमी यांच्या वतीने राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे ‘वंदे मातरम्’ या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे कीर्तन होणार आहे.

 

या कीर्तनात ‘वंदे मातरम्’ या गीताचे विविध ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर पैलू चारुदत्त आफळे उलगडून सांगणार आहेत. बँकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीतामागील स्वातंत्र्यलढ्याशी असलेला संबंध, गीतातील भावार्थ, आणि भारतीय जनतेला एकत्र आणणारी प्रेरणा यांचा सखोल वेध ते घेणार आहेत.

 

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments