Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedटेनेको क्लिन एअर इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 12 नोव्हेंबर 2025...

टेनेको क्लिन एअर इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 12 नोव्हेंबर 2025 पासून होणार सुरू

प्रति इक्विटी शेअरसाठी 378 रु. ते 397 रु. पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित

 

 

 

· फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रति शेअर 10रु.) 37.80 पट आणि कॅप प्राईस 39.70 पट

 

· बोली/ऑफर बुधवार 12 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल. (“Bid Dates”).

 

· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 आहे.

 

· बोली किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)

 

· RHP लिंक: http://jmfl.com/Common/getFile/5370

 

 

 

राष्ट्रीय, 07 नोव्हेंबर 2025: टेनेको क्लिन एअर इंडिया लिमिटेड (“COMPANY”) इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर बुधवार 12 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करत आहे.

 

 

 

प्रति इक्विटी शेअरसाठी 378 रु. ते 397 रु. पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“Price Band”).

 

 

 

बोली किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Minimum Bid Lot”)

 

 

 

टेनेको मॉरिशस होल्डिंग्ज लिमिटेड (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) द्वारे प्रती शेअर 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफर (“Total Offer Size”) मध्ये 36,000 दशलक्ष रु. (3,600 कोटी रु.) पर्यतच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.

 

 

 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 12 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

 

 

 

या रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे सादर करण्यात येणारे कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या प्रस्तावासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज आहे.

 

 

 

जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

 

 

 

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

 

 

 

ही ऑफर 1957 च्या SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणूकदार वगळून इतर) उपलब्ध करून दिला जाईल. वैध बोली ऑफर प्राईसइतकी किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

 

 

 

सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Investors (“Retail Portion”) साठी ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग वाटपासाठी उपलब्ध राहिल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments