Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर शाहू वसाहतीतील एस.आर.ए. प्रकल्पास स्थगिती पुणे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर शाहू वसाहतीतील एस.आर.ए. प्रकल्पास स्थगिती पुणे :

 

पुणे :

पर्वती परिसरातील शाहू वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावर अखेर शासनाने स्थगितीचा निर्णय घेतला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे (SRA) यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, या प्रकल्पाची पुढील कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे.

 

हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे घेण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, प्रकल्पातील अनियमितता आणि विकासकाविरुद्ध दाखल झालेल्या आक्षेपांनंतर राज्याच्या सर्वोच्च पातळीवरून हा निर्णय देण्यात आला आहे.

 

शाहू वसाहत बचाव नागरिक कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत, शासनाने नागरिकांच्या हक्कांचा विचार करून ही स्थगिती लागू केली.

 

नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले की, “ही स्थगिती म्हणजे न्यायासाठीच्या संघर्षाचे फळ आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा सन्मान करून दिलेला हा निर्णय सर्वसामान्यांच्या विश्वासाचा विजय आहे.”

 

प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाची पुढील प्रक्रिया पारदर्शक आणि सर्व संबंधित नागरिकांच्या सहभागातूनच पुढे नेण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments