Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या 13 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन

पुण्यात इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या 13 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन

पुणे,11 नोव्हेंबर 2025 : आरोग्यसेवा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आधुनिक उपकरणे व पध्दती येत असताना मानवी स्पर्श, वैद्यकीय उत्कृष्टता आणि परिचारिकांचे नेतृत्व हे दर्जेदार आरोग्यसेवेचे आधारस्तंभ असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

 

इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडिया (आयएनएस) पुणे चॅप्टर आणि नोबल हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने 7 व 8 नोव्हेंबर 2025 रोजी सुझलॉन वन अर्थ येथे 13 व्या वार्षिक आयएनएस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लाईन्स ऑफ केअर,लाईफलाईन्स ऑफ चेंज : ॲडव्हान्सिंग इनफ्युजन प्रॅक्टीस फॉर रेझिलियंट टुमारो ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेचा उह्ेश्य इनफ्युजन केअरला चालना देणे, परिचारिका क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि शिक्षण व इनफ्युजन नर्सिंगमधील नवकल्पनांवर चर्चा करणे हा होता. या परिषदेत 500 हून अधिक परिचारिका प्रत्यक्षरित्या आणि 2000 हून अधिक परिचारिका ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कमांडंट ऑफ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे संचालक व लेफ्टनंट जनरल पंकज पी.राव, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या रजिस्ट्रार डॉ.अर्चना बधे, राज्य आरोग्य नर्सिंग विभागातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.निलिमा सोनावणे यांसह कन्सॉर्टियम ऑफ ॲक्रिडिएटेड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष डॉ.विजय अगरवाल, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, रूबी हॉल क्लिनिकच्या व्यवसाय धोरण आणि कामकाज विभागाच्या सरव्यवस्थापक नताली ग्रांट आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजन समितीमध्ये इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोलोनेल बीनू शर्मा,उपाध्यक्ष कोलोनेल मधुकरी रे,राष्ट्रीय सचिव कॅप्टन संध्या शंकर,आयोजन समितीच्या अध्यक्ष तृप्ती नंदा आणि सहअध्यक्ष आर्या कुलकर्णी व डॉ.श्रीलेखा राजेश यांचा समावेश होता.

 

कोलोनेल बीनू शर्मा हे या परिषदेमागच्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शक शक्ती आहेत.

 

रूग्ण व्यवस्थापनामधील सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक असलेल्या इन्फ्युजन थेरपीसाठी केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे तर,जागरूकता,सहानुभूती आणि सातत्याने कौशल्य विकसित करणे देखील आवश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले.

 

कमांडंट ऑफ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे संचालक व लेफ्टनंट जनरल पंकज पी.राव म्हणाले की, इन्फ्युजन थेरपी ही सर्वात सामान्यपणे वापरली जाणारी प्रक्रिया असली तरी रूग्ण सेवेच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि रूग्ण परिणामांवर प्रभाव पडतो.शिरांमधून द्रव पदार्थ शरीरात टाकण्यासाठी विविध उपकरणांचा वापर,संक्रमणांपासून प्रतिबंध आणि सुरक्षा पध्दती सुनिश्चित करत रूग्ण बरे होण्यामध्ये मदत करणे ही एक आव्हानात्मक बाब आहे.इनफ्युजन मध्ये तांत्रिक कौशल्याशिवाय परिचारिकांना 24 तास जागरूक राहावे लागते आणि अगदी बारीक गोष्टींकडे देखील विशेष लक्ष द्यावे लागते.त्यामुळेच सातत्याने सराव आणि कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.म्हणूनच अशा परिषदा उपयुक्त ठरतात. शिरांमध्ये टाकलेली प्रत्येक नळी,उपचार पध्दती यामुळे रूग्णाला नवजीवन प्राप्त होते.संशोधन,अभिनवता,आधुनिकीकरण आणि सतत सुधारणा यांमुळे या प्रक्रिया अधिक सुरक्षित होऊन रूग्ण व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत लोकांना एक नवी आशा निर्माण करू शकतात.नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना मानवी स्पर्श हाच महत्त्वाचा घटक आहे.

 

कन्सॉर्टियम ऑफ ॲक्रिडिएटेड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्सचे अध्यक्ष डॉ.विजय अगरवाल म्हणाले की,परिचारिकांनी आरोग्य सेवेत नेतृत्वाची भूमिका बजावायला हवी.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या रजिस्ट्रार डॉ.अर्चना बधे म्हणाल्या की,परिचारिका या फक्त काळजी घेणाऱ्या नसतात तर जीवन वाचविणाऱ्या असतात.त्यामुळे परिचारिकांना कौशल्य प्रदान करत सक्षमीकरण म्हणजे केवळ आरोग्य सेवा प्रणालीला सक्षम करणे नव्हे तर रूग्णांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविणे आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये आम्ही शिक्षण,अभिनवता व सचोटीने ही भावना जोपासण्यासाठी वचनबध्द आहोत.

 

राज्य आरोग्य नर्सिंग विभागातील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.निलिमा सोनावणे म्हणाल्या की,प्रत्यक्ष प्रशिक्षणासह कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे.परिचारिकांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित कराव्यात असे त्यांनी संस्थेला सांगितले.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,हॉस्पिटलमध्ये असताना ज्यावेळी मी रूग्णांना पाहायला जातो,तेव्हा मला दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.त्यातील एक म्हणजे आरोग्यातील सुधारणा किंवा बिघाड दर्शविणारा रूग्णाचा चेहरा आणि दुसरी म्हणजे आयव्ही लाईन जी केवळ इन्फ्युजन लाईन नाही तर एक जीवनदायिनी आहे. रूग्णांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.जेसीआय, एनएबीएच यासारख्या मान्यतांंविषयी बोलताना ते म्हणाले की,आम्ही नेहमीच दर्जेदार देखभाल व सेवेला महत्त्व दिले आहे आणि यामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे.

 

इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोलोनेल बीनू शर्मा म्हणाल्या की,दाखल झालेल्या प्रत्येक रूग्णाला आयव्ही लाईनची गरज लागते.गंभीर परिस्थितीत असलेल्या रूग्णांना सेंट्रल लाईन,आर्टेरियल लाईन,डायलिसिसवर असलेल्या रुग्णाला कॅथेटर,केमोथेरपी घेत असलेल्या रूग्णाला हिकलाईन व केमोपोर्टची गरज असते.ज्यामुळेच इनफ्युजन थेरपी रूग्ण व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे.यामध्ये अनेक लाईन्स या परिचारिकांद्वारे शिरांमध्ये टाकण्यात किंवा व्यवस्थापित करण्यात येतात.त्यामुळेच रूग्ण सुरक्षेच्या दृष्टीने सराव व प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.आमच्या संघटनेचे ध्येय हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे आणणे,ज्ञान व कौशल्य आधारित व्यासपीठ प्रदान करणे आहे.जेणे करून रूग्णांसाठी सुरक्षित व उत्कृष्ट सेवा प्रदान केल्या जातील.त्या म्हणाल्या की,आयएनएसचे भारतात 17 चॅप्टर्स असून 5000 हून अधिक सदस्य आहेत.

 

स्वागतपर भाषण करताना इन्फ्युजन नर्सेस सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सचिव कॅप्टन संध्या शंकर म्हणाल्या की, इन्फ्युजन म्हणजे केवळ आयव्ही लाईन्स किंवा उपकरणे नव्हे तर रूग्णांच्या आरोग्याची पुर्नप्राप्ती,सन्मान आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास दर्शविते.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,ही परिषद म्हणजे केवळ शैक्षणिक मेळावा नव्हता,तर उत्कृष्टता,अचूकता आणि ध्येयाचा उत्सव होता.खऱ्या अर्थाने या परिषदेने आपल्या विषयांसह आणि सहभागासह भविष्यातील परिषदांसाठी एक मापदंड प्रस्थापित

केला आहे.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments