Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्राची ४ पदकांवर मोहोर

राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्राची ४ पदकांवर मोहोर

१०, १२, १७ आणि १९ वय वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

 

पुणे, दि. ११ नोव्हेंबर, २०२५ : उत्तराखंड मधील देहरादूर येथे राष्ट्रीय बँडी असोसिएशनच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या ७ व्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ४ संघांनी पदकांची कमाई करीत स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्र बँडी समितीच्या वतीने निवड करण्यात आलेल्या तब्बल ४० खेळाडूंनी यावर्षी ७ व्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यांपैकी १० वर्षांखालील मुले, १२ वर्षांखालील मुली, १७ वर्षांखालील मुली आणि १९ वर्षांखालील मुले या चार संघांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली आहे.

 

१०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली असे एकूण ५ संघ महाराष्ट्राच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धेत उतरले होते त्यांपैकी ४ संघानी पदकांची कमाई करीत संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकावर नेत राज्याचे नाव या स्पर्धेत आणखी मोठे केले असल्याची प्रतिक्रिया पुणे जिल्हा बँडी असोसिएशनचे अध्यक्ष व पुणे जिल्ह्याच्या आईस हॉकी असोसिएशनचे सचिव अजय जगताप यांनी दिली.

 

७ व्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेमध्ये १० वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने तामिळनाडूच्या संघाला १- 0 ने हरवीत कांस्य पदक जिंकले. तर १२ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्तरप्रदेशच्या संघाला २-१ ने पराभूत करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने रौप्य पदक जिंकले तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने कांस्य पदक मिळविले.

 

बॅंडी, आइस हॉकीसारखाच एक खेळ असून रशियाचा खेळ म्हणून तो प्रसिद्ध आहे. हा खेळ संपूर्ण युरोप सोबतच स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये, बाल्टिक देशांमध्ये व मंगोलियामध्ये खेळला जातो. मागील काही वर्षांपासून हा खेळ भारतात प्रचलित होत असून राष्ट्रीय स्तरावर या खेळाची ही ७ वी राष्ट्रीय स्पर्धा होती. मागील २ वर्षांपासून महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत सहभागी होत असून महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे विशेष.

 

राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या महाराष्ट्राच्या संघात राज्याच्या पंढरपूर, रायगड, कोल्हापूर, मुंबई, पुणे या भागातील खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश होता. तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी ८ ते ९ राज्यांमधून ४० हून अधिक संघ देहारादूर येथे दाखल झाले होते. या संघांमध्ये महाराष्ट्रासोबतच उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान, गुजराथ, हरियाणा, दिल्ली या राज्यांतील संघांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या संघाच्या पुण्यातील खेळाडूंना डॉ. कलमाडी श्यामराव जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शोभा चन्नाल यांनी सरावासाठी कॉलेज उपलब्ध करून दिले होते, ज्याचा उपयोग खेळाडूंना झा

ला.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments