Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedकायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीचा शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ...

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीचा शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून केला

कायनेटिकच्या पुण्याच्या वारशात रुजलेल्या आध्यात्मिक स्थानासाठी डिलिव्हरी करून राष्ट्रव्यापी डिलिव्हरीची सुरुवात केली

 

पुणे, महाराष्ट्र, 20 नोव्हेंबर 2025: सुप्रसिद्ध कायनेटिक समूहाची इलेक्ट्रिक वाहनांची शाखा कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने आपल्या अलीकडेच लॉन्च केलेल्या कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीची अधिकृत सुरुवात केली आहे. डिलिव्हरीचा शुभारंभ करताना कंपनीने पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी प्रतिकात्मक डिलिव्हरी केली. ही डिलिव्हरी म्हणजे कायनेटिकचा वारसा जिथे जन्माला आला, त्या पुण्यनगरीला भावपूर्वक वाहिलेली आदरांजली आहे.

 

1893 मध्ये स्थापन झालेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे महाराष्ट्राच्या भक्तीचे आणि सामुदायिक ऐक्याचे प्रतीक आहे. येथे दर वर्षी दर्शनासाठी लक्षावधी लोक येतात. अशा धार्मिक स्थानापासून कायनेटिक DX च्या प्रवासाची सुरुवात करण्याच्या कृतीमधून या ब्रॅंडचे पुण्याशी असलेले घट्ट नाते दिसून येते. ही पुणे आणि समस्त देशासाठी एका भविष्य-उन्मुख गतीशीलतेच्या गाथेची सुरुवात आहे.

 

ही नवीन कायनेटिक DX श्रेणी एका आधुनिक इलेक्ट्रिक युगात मूळ कायनेटिक DX ची विश्वासार्हता आणि लोकप्रियता घेऊन येत आहे. भारतीय कुटुंबांच्या बदलत्या जीवनशैलीशी सुसंगत बनवलेल्या या स्कूटरमध्ये मजबूत मेटल बॉडी, ऐसपैस फ्लोरबोर्ड आणि सीट खाली या श्रेणीतील सर्वाधिक 37-लीटर स्टोरेज क्षमता आहे. या स्कूटरची ताकद 2.6 kWh रेंज-X LFP बॅटरीत असून जिचे जीवनमान भारतातील इतर NMC बॅटरी-संचालित स्कूटर्सच्या तुलनेत 4 पटींपर्यंत जास्त आहे, शिवाय राईड स्थिरता आणि सुरक्षा आहे.

 

नित्याच्या सोयी-सुविधांव्यतिरिक्त या स्कूटरमध्ये या सेगमेन्टमध्ये प्रथमच दाखल केलेली फीचर्स आहेत:

ईझी की – खऱ्या अर्थाने त्रास-मुक्त की-लेस संचालनासाठी – होमोलोगेशन मंजुरीच्या अधीन

ईझी चार्ज (DX+ वर) – एक रिट्रॅक्टेबल चार्जिंग केबल, ज्यामुळे चार्जिंग सोयिस्कर आणि सहज होते

ईझी फ्लिप – अतिरिक्त सुविधेसाठी वन-टच पिलियन फूटरेस्टची मांडणी.

 

कायनेटिक DX EV मॉडेल रेंज सोबत एक समर्पित मोबाइल अॅप येते, तर DX+ हे व्हेरियन्ट प्रगत टेलीकायनेटिक फीचर्ससह चालकाचा अनुभव अधिक उन्नत करते. या फीचर्समध्ये रियल-टाइम राईडची आकडेवारी आणि वाहनाचा डेटा, जिओ फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे. 16 भाषांमधील माय कायनी व्हॉईस अलर्ट्स सह या स्कूटरला एक व्यक्तिमत्व बहाल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ही स्कूटर चालकाला भेटते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सुरक्षितता आणि स्कूटरच्या कार्यांबाबत जागरूक देखील करते. या दोन्ही व्हेरियन्टमध्ये ब्लूटुथ मार्फत तत्काळ CRM कनेक्टसाठी एक समर्पित कायनेटिक असिस्ट स्विच आहे. इतर ब्लूटुथ सक्षम फीचर्समध्ये बिल्ट-इन स्पीकर सह म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशनचा समावेश आहे. कायनेटिक DX आणि DX+ या दोन्ही मॉडेल्समध्ये क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट आणि हिल होल्ड फीचर्स आहेत.

 

कायनेटिक DX ची किंमत 1,11,499 रु. आहे, तर कनेक्टेड कायनेटिक DX+ ची किंमत 1,17,499 रु. आहे (एक्स-शोरूम, पुणे). DX+ लाल, निळा, सफेद, सिल्व्हर आणि काळा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, DX व्हेरियन्ट सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे: www.kineticev.in.

 

9 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) कव्हरेज देणाऱ्या वाढीव वॉरंटी पॅकसह ग्राहक आपला मालकीचा अनुभव आणखी सुधारू शकतात. तसेच 100 किमी पर्यंत रोडसाइड असिस्टन्स (RSA) कव्हरेज मिळवू शकतात. हे पॅकेज कायनेटिक DX आणि कायनेटिक DX+ या दोन्ही मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे.

 

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लि. विषयी

सप्टेंबर 2022 मध्ये स्थापन झालेली कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स (KWV) ही कायनेटिक इंजिनियरिंग लि. ची, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांचे नेतृत्व लाभलेली, एक समर्पित साहाय्यक इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) उत्पादन कंपनी आहे. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातील कायनेटिकचा महान वारसा पुढे नेत, KWV नावीन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि टिकाऊ EV सोल्यूशन्सचे सर्जन करण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. 87,000 चौरस फुट जागेत पसरलेली ही अत्याधुनिक उत्पादन सुविधेसह KWV स्केलेबल आणि ईको-फ्रेंडली उत्पादन, अत्याधुनिक ऑटोमेशन आणि गुणवत्ता प्रणालींची सांगड घालते. यामधून त्यांची सुरक्षित, उच्च-परफॉर्मन्स देणारी आणि शहरी गतीशीलतेची व्याख्या करणारी, खऱ्या अर्थाने मेड-इन-इंडिया EV उत्पादने प्रदान करण्याची वचनबद्धता दिसून येते.

 

 

कायनेटिक इंडियाविषयी

कायनेटिक इंडिया ही भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातील अग्रणी कंपनी आहे, जी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या कायनेटिक लूना आणि कायनेटिक DX सादर करण्याबद्दल ओळखली जाते. ही क्रांतिकारी मॉडेल्स घराघरात पोहोचली होती आणि एका संपूर्ण पिढीसाठी शहरी गतीशीलतेचा पर्याय बनली होती. या गाड्यांनी कायनेटिकला इनोव्हेशन आणि विश्वासाचे प्रतीक बनवले. पाच दशकांपेक्षा जास्त वर्षांपूर्वी स्व. श्री. H K फिरोदिया द्वारा स्थापित आणि पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांचे नेतृत्व लाभलेल्या कायनेटिक समूहाने आपल्या कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड या महत्त्वाच्या कंपनीच्या माध्यमातून इंजिनियरिंग उत्कृष्टतेबाबत सतत बेंचमार्क स्थापित केले आहेत. आज हा समृद्ध वारसा पुढे नेत कायनेटिक ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आधुनिक सोल्यूशन्स प्रदान करून कायनेटिक गतीशीलतेचे भवितव्य घडवण्याचे काम करत आहे. कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूची

बद्ध (BSE: 500240) आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments