● फ्लिपकार्ट १ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या बंगळुरू येथील मुख्यालयात ‘ब्युटी कॅटॅलिस्ट’ परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजित करत आहे.
● हा कार्यक्रम उदयोन्मुख डी२सी ब्युटी ब्रँडना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्लेबुक्स, प्लॅटफॉर्म इनसाइट्स आणि प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सची सुविधा देईल.
● यावेळी ५०+ डी२सी ब्युटी आणि पर्सनल केअर ब्रँड सहभागी होण्याची अपेक्षा असून त्यात असाया, टुको, न्यूड, निसारा, ब्रिट अॅक्सेंट, अंडररेटेड, ट्रू हेअर, बेकल्म, डर्मलिस्ट आणि इतरही ब्रँड्स समाविष्ट असतील.
बंगळुरू- २४ नोव्हेंबर २०२५: भारतातील देशांतर्गत ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्ट असलेले १ डिसेंबर २०२५ रोजी बेंगळुरूच्या मुख्यालयात उदयोन्मुख सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी (बीपीसी) ब्रँडसाठी तयार केलेल्या डी२सी फोरम ‘ब्युटी कॅटॅलिस्ट’ परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. भारतातील डी२सी सौंदर्य प्रसाधन अर्थव्यवस्थेला आकार देण्यात हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून ब्युटी कॅटॅलिस्ट कार्यक्रमाचे आयोजन याच पायावर केले गेले आहे. त्याचे उद्दिष्ट उद्देश उदयोन्मुख ब्रँडना संरचित मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्मवर त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी संधी देण्याचे आहे. या कार्यक्रमात स्किनकेअर, हेअरकेअर, कॉस्मेटिक्स आणि वेलनेस श्रेणीतील ५०+ डी२सी ब्रँड एकत्र येतील जेणेकरून त्यांना नवीन वाढीच्या संधींचा शोध घेता येईल आणि डिजिटल वातावरणात व्याप्ती वाढवण्यासाठी धोरणांची देवाणघेवाण करता येईल. यात असाया, टुको, न्यूड, निसारा, ब्रिट अॅक्सेंट, अंडररेटेड, ट्रू हेअर, बेकल्म, डर्मलिस्ट अशा अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.
नवीन युगातील सौंदर्य उद्योजकांना आपल्या विस्तारासाठी पुढील टप्पा उलगडण्यास मदत करण्यासाठी असलेली ही परिषद ब्रँडना फ्लिपकार्टवर प्रभावीपणे कसे निर्मिती आणि विस्तार करता येईल हे समजून घेण्यासाठी एक केंद्रित वातावरण तयार करेल. ब्रँडना आपल्या व्यवसायाचा पाया मजबूत करण्यास, दृश्यमानता वाढवण्यात आणि डेटावर आधारित माहिती आणि प्लॅटफार्मवरील मदत करणाऱ्या बाबींमुळे व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यात फ्लिपकार्टची भूमिका अधोरेखित होईल.
उदयोन्मुख ब्रँड्ससमोरील प्रमुख वाढीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, उपस्थितांना खास तयार केलेले उपाय, धोरणात्मक मार्गदर्शन आणि श्रेणी तज्ञांकडून व्यावहारिक शिफारसी मिळतील. या कार्यक्रमात पोझिशनिंग, मर्चेंडायझिंग, खरेदीदार सहभाग आणि ब्रँड स्टोरीटेलिंग या विषयांवर सखोल अभ्यास सत्रे असतील, संस्थापकांना दृश्यमानता वाढविण्यासाठी आणि वेगळे ग्राहक अनुभव देण्यासाठी साधनांसह सुसज्ज केले जाईल.
फ्लिपकार्टचे ब्युटी अँड पर्सनल केअर विभागाचे वरिष्ठ संचालक कार्तिक कनुमुरु म्हणाले, “ब्युटी कॅटॅलिस्ट परिषद ही एक विशेषरित्या तयार केलेली जागा आहे जिथे आम्ही फ्लिपकार्टवर आणखी विस्तारासाठी सज्ज असलेल्या नवीन डी२सी बीपीसी ब्रँड्सना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो. आमची पहिली डी२सी परिषद म्हणून आम्ही याचे आयोजन फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये करण्याचा मानस ठेवतो. त्यामुळे तरुण आणि नवोदित उद्योजकांना एकाच छताखाली प्लॅटफॉर्मची पूर्ण क्षमता अनुभवता येईल. सुयोग्य मार्गदर्शन, सखोल ज्ञान आणि फ्लिपकार्टच्या परिसंस्थेतील प्रवेशाद्वारे आम्ही उद्योजकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू इच्छितो. आमचे लक्ष आमच्या विक्रेता भागीदारांसाठी दीर्घकालीन मूल्य सक्षम करण्यावर असून हा उपक्रम त्या वचनबद्धतेचा विस्तार आहे.”
या परिषदेबाबत बोलताना पिल्ग्रिमचे सह-संस्थापक अनुराग केडिया म्हणाले, “सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात आमची उपस्थिती मजबूत करत असताना फ्लिपकार्ट आम्हाला सातत्यपूर्ण पद्धतीने वाढ करण्यात एक प्रमुख भागीदार राहिला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून ते सुयोग्य नियोजनापर्यंत या प्लॅटफॉर्मने आमच्या वाढीच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्युटी कॅटॅलिस्टसारखा उपक्रम उदयोन्मुख ब्रँडना प्रभावीपणे लोकांच्या नजरेत येण्यासाठी स्पष्टता आणि दिशा देऊ शकतो.
फ्लिपकार्टची डी२सी परिषद आम्हाला अर्थपूर्णपणे वाढ करण्यासाठी मदत करतो. ग्राहकांच्या वर्तनाबद्दल संबंधित माहिती मिळवण्यापासून ते आमची दृश्यमानता आणि स्थान कसे वाढवायचे हे समजून घेण्यापर्यंत हा उपक्रम आमच्यासारख्या ब्रँडना स्पर्धात्मक परिसंस्थेत वाढण्यासाठी आवश्यक असलेली दिशा देतो.”
टुकोचे सह-संस्थापक चाणक्य म्हणाले, “ब्युटी कॅटॅलिस्ट कॉन्क्लेव्ह आपल्याला धोरणात्मकदृष्ट्या विस्तार कसा करायचा याची स्पष्ट माहिती देते. त्यातून आम्हाला आमची स्थिती सुधारण्यात, दृश्यमानतेसाठी अधिक प्रभावीपणे योजना करण्यात आणि अधिक संरचित पद्धतीने डिजिटल स्केलकडे जाण्यास मदत करेल. तज्ञांची माहिती आणि समवयस्कांचे शिक्षण एकत्र आणून हा कार्यक्रम आमच्या ब्रँडच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी एक मजबूत सक्षमकर्ता म्हणून काम करतो. विकसनशील सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात आमची उपस्थिती मजबूत करण्याची ही एक मौल्यवान संधी म्हणून आम्ही पाहतो.”
फ्लिपकार्ट ब्युटी कॅटॅलिस्ट परिषद ही भारतातील पुढील पिढीतील ब्युटी ब्रँडना सहभाग, सक्षमीकरण आणि विस्तार करण्यासाठी एका केंद्रीभूत प्रयत्नाची सुरुवात आहे. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात सतत बदल होत असताना, फ्लिपकार्ट दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे ब्रँडना उद्देश आणि परिणामासह विस्तार करण्यास मदत होईल.
इच्छुक ब्रँड्स येथे here नावनोंदणी करू शकतात.


