Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान संवर्धनासाठी स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे — विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात सूर

संविधान संवर्धनासाठी स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे — विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात सूर

 

 

पुण्यात विजयादशमीला तरुणांची ५९ सघोष पथसंचलने उत्साहात पार; संघाच्या शताब्दी वर्षातील कार्याचा आढावा

 

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२६:

 

“संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आणि देशभक्त नागरिकांची निर्मिती हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. आज जगभरात अराजकतेच्या माध्यमातून सांविधानिक व्यवस्थांवर हल्ले केले जात आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय सांविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी संघ स्वयंसेवकांनी सदैव अग्रेसर राहिले पाहिजे,” असा ठळक आणि स्पष्ट सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात उमटला.

 

मंगळवारी (दि. २० ऑक्टोबर) पुणे शहरात तरुणांची तब्बल ५९ सघोष पथसंचलने अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडली, ज्यामध्ये २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. बाल विभागासह उर्वरित संचलने आठवडाभरात पार पडणार आहेत. सर्वच शस्त्रपूजन उत्सवांमध्ये संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचे सिंहावलोकन करण्यात आले. आगामी काळातील देशासमोरील आव्हाने आणि ‘पंचपरिवर्तना’च्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्यावर या वेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाचा झालेला विस्तार, गृहसंवाद अभियान, हिंदू संमेलने आणि प्रबुद्ध नागरिकांच्या बैठकांचा आढावा या वेळी घेण्यात आला. “संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत उपेक्षा, विरोध, दखल आणि अनुकूलता असे चार महत्त्वाचे टप्पे आले. मात्र, या संपूर्ण प्रवासात संघाने आपले ध्येय आणि राष्ट्रीय विचारांशी असलेली बांधिलकी कायम ठेवली. तसेच हिंदू समाज हा मूळातच परिवर्तनशील आहे. हिंदुत्व आणि संविधानातील मूल्ये परस्परविरोधी नसून समता, स्वातंत्र्य व बंधुता जपणे हे प्रत्येक नागरिकाचे परमकर्तव्य आहे,” अशी आग्रही मांडणी वक्त्यांनी केली.

 

– सज्जनशक्तीला सोबत घेऊन राष्ट्रनिर्माण — मनमोहनजी वैद्य :

गोखलेनगर येथील कार्यक्रमात संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मनमोहनजी वैद्य म्हणाले, “‘वसुधैव कुटुंबकम्’ हीच भारताची खरी ओळख आहे. या जीवनदृष्टीला अनुसरून स्वयंसेवकांनी राष्ट्रनिर्माणासाठी समाजात प्रत्यक्ष उतरून काम केले पाहिजे. यासाठी समाजातील सर्व सज्जनशक्तीला सोबत घेणे आवश्यक आहे.” सेवा, संपर्क, ग्रामविकास, समरसता, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांतील संघाच्या भरीव कार्यामुळे आज समाजाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

– हिंदुत्ववाद म्हणजेच खरा संविधानवाद :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील उत्सवात पुणे महानगर कार्यकारिणी सदस्य महेश पोहनेरकर यांनी आगामी कार्याची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनवणे तसेच जातिभेद व आर्थिक विषमता नष्ट करणे गरजेचे आहे. संविधानातील मूल्यांचे रक्षण करतानाच अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. वस्तुतः हिंदुत्ववाद म्हणजेच खरा संविधानवाद आहे.”

—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments