पुणे, दि. 28 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता बंद करण्यात यावे; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे.
जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
00000


