पुणे, दि. 28 : 69 वी राष्ट्रीय शालेय जलतरण डायविंग क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत त्यागराज स्टेडियम, दिल्ली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 14, 17 व 19 वर्षाखालील मुलांचा संघ 27 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना झाला.
संघ दिल्लीकडे रवाना होताना पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी योगेश खोब्रागडे, दादासाहेब देवकते, क्रीडा मार्गदर्शक बालाजी केंद्रे, नीलकंठ आखाडे तसेच संघ व्यवस्थापक तलवाडे, म्हेत्रे, भालेराव, कुरपे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य संघ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास संचालनालयाने व्यक्त केला.


