Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनआयए मरीन कॉन्क्लेव्ह 2025 : भारताच्या वाढत्या सागरी व्यापारासाठी भक्कम संरक्षणाची गरज...

एनआयए मरीन कॉन्क्लेव्ह 2025 : भारताच्या वाढत्या सागरी व्यापारासाठी भक्कम संरक्षणाची गरज अधोरेखित*

 

 

पुणे, भारत: नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी (NIA), पुणे यांनी 9–10 डिसेंबर 2025 या कालावधीत आपल्या परिसरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय “इंडिया मरीन कॉन्क्लेव्ह 2025” या मुख्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. “नेव्हिगेटिंग द वेव्ह्स ऑफ चेंज: एक्सप्लोरिंग मरीन इन्शुरन्स फ्रंटियर्स” या केंद्रबिंदू विषयावर आधारित या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील प्रमुख विमा कंपन्या, ब्रोकर्स, सर्व्हेअर्स, मोठ्या कॉर्पोरेट संस्थांचे रिस्क मॅनेजर्स, सागरी उद्योगातील हितधारक आणि नियामक प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या मरीन इन्शुरन्स क्षेत्राचा भावी मार्गनकाशा तयार करण्यासाठी या व्यासपीठाने महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणल्या.

भारताकडे विस्तृत किनारपट्टी असूनही आणि सागरी व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतानाही, मरीन इन्शुरन्सचा प्रसार आजही अत्यंत कमी आहे. देशातील एकूण नॉन-लाईफ इन्शुरन्सचे जीडीपीतील योगदान 1 टक्क्यांपेक्षा कमी असून त्यातीलही मरीन इन्शुरन्सचा वाटा नगण्य आहे. देशातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार नेटवर्क झपाट्याने वाढत असताना, हा संरक्षणातील तुटवडा उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आव्हाने निर्माण करत आहे.

या पार्श्वभूमीवर कॉन्क्लेव्हमध्ये खालील चार प्रमुख विषयांवर सखोल चर्चा झाली:

• भारतात मरीन इन्शुरन्सचा प्रसार वाढवणे

• बदलत्या जागतिक आणि देशांतर्गत जोखीम परिदृश्याला प्रतिसाद देणे

• आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि आधुनिक अंडररायटिंग साधनांचा अवलंब

• भारताच्या पायाभूत सुविधांच्या आणि सागरी विस्ताराच्या गतीशी सुसंगत राहणे

जागतिक राजकारणातील बदल, हवामान बदल, आणि तंत्रज्ञानातील परिवर्तन यामुळे सागरी जोखमी कशा बदलत आहेत, यावर तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी सविस्तर विवेचन केले. अंडररायटिंग क्षमता वाढवणे, डिजिटल परिवर्तनावर भर देणे आणि संपूर्ण इकोसिस्टममध्ये सहकार्य वाढवणे यावर उद्योगातील नेत्यांनी जोर दिला.

उद्घाटन सत्राची सुरुवात श्री. बी. सी. पटनाईक, संचालक, NIA यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी भारताच्या सागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मरीन इन्शुरन्सचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर श्री. इंदरजीत सिंग, सचिव जनरल, जनरल इन्शुरन्स कौन्सिल यांनी मजबूत मरीन इन्शुरन्स फ्रेमवर्कसाठी उद्योगातील सहकार्याची गरज सांगितली. सुश्री. गिरिजा सुब्रमणियन, CMD, द न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड यांनी व्यापार टिकावासाठी मरीन इन्शुरन्सची भूमिका आणि जागतिक सर्वोत्तम तत्त्वांचा अवलंब करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

 

मुख्य अतिथी डॉ. तपन सिंगेल, एमडी आणि सीईओ, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड यांनी बदलत्या जोखीम परिदृश्यावर आणि इनोव्हेशन व क्षमता-वृद्धीच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.

श्री. लार्स लांगे, सचिव जनरल, इंटरनॅशनल युनियन ऑफ मरीन इन्शुरन्स (IUMI) यांनी जागतिक मरीन उद्योगातील भू-राजकीय, तांत्रिक आणि टिकाऊपणा संबंधी आव्हानांचा आढावा घेतला आणि बदलत्या काळात उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींची चर्चा केली.

या निमित्ताने श्री. बी. सी. पटनाईक, संचालक, नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी म्हणाले:

“या कॉन्क्लेव्हचे उद्दिष्ट म्हणजे मरीन इन्शुरन्स क्षेत्रातील सर्वांना एका व्यासपीठावर आणून प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या आव्हानांचे आकलन करणे. भारताचा व्यापार झपाट्याने वाढत आहे, आणि आपल्या इन्शुरन्स पद्धतींनी त्या वेगाशी जुळवून घ्यायला हवे. आमचे ध्येय सोपे आहे — मरीन इन्शुरन्स अधिक सुलभ करणे, अधिक पारदर्शक बनवणे आणि भारताच्या वाढत्या सागरी क्रियाकलापांना सक्षम संरक्षण देणे. दोन दिवसांच्या चर्चांतून सर्व बाजूंनी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची तयारी स्पष्ट दिसून आली.”

मुख्य अतिथी म्हणून आपले विचार मांडताना डॉ. तपन सिंगेल, एमडी आणि सीईओ, बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड यांनी असे नमूद केले: “तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विम्याच्या मूलभूत कार्यपद्धतींमध्ये – अंडररायटिंगपासून क्लेमपर्यंत – झपाट्याने बदल घडवत आहेत. ऑटोमेशन वेगाने वाढत असल्याने कोणतीही भूमिका पूर्णपणे सुरक्षित राहिलेली नाही. मशीन पॅटर्न विश्लेषण करू शकतात, परंतु खरा मानवी मूल्य आपला निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि डेटा पलीकडील समस्यांचे समाधान करण्याच्या क्षमतेत आहे. आज एरोस्पेसमध्ये दिसणारे बदल उद्याच्या शिपिंग आणि मरीन क्षेत्राला आकार देतील. भविष्यात यश त्यांच्याच वाट्याला येईल जे लवकर जुळवून घेतील, सतत नवकल्पना करतील आणि तंत्रज्ञानाच्या पुढे राहतील.”

 

प्रमुख सत्रांमध्ये कार्गो सर्टिफिकेट्सचे डिजिटायझेशन, AI-आधारित अंडररायटिंग, तसेच स्पष्टता आणि कस्टमायझेशन वाढवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सर्टन्टी या विषयांचा आढावा घेण्यात आला.

फार्मास्युटिकल्स, बल्क कमोडिटीज, ओव्हर-डायमेन्शनल कार्गो, आणि इलेक्ट्रिक वाहने वाहतूक करण्याच्या प्रोटोकॉलसह विशेष कार्गो जोखीम विम्याचे सखोल विश्लेषण करण्यात आले. प्रतिष्ठित विमा तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चेत देश-विदेशातील सर्वोत्तम उद्योग पद्धतींचा आढावा घेण्यात आला, ज्यामुळे मरीन कार्गो पोर्टफोलिओमध्ये नफा आणि शाश्वत वाढ साध्य करता येईल.

कॉन्क्लेव्हमधून “मॅरिटाईम इंडिया व्हिजन 2030”, बंदर आधुनिकीकरण, जहाजबांधणी विकास, आणि देशांतर्गत प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी (P&I) फ्रेमवर्क मजबूत करण्यासंबंधी उपयुक्त सूचना मांडण्यात आल्या.

संपूर्ण मूल्यसाखळीला एकत्र आणत, या कार्यक्रमाने मरीन इन्शुरन्स क्षेत्रातील दुप्पट वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि कार्गो इन्शुरन्सचा प्रसार वाढवण्यासाठी उद्योग-नेतृत्वाखालील उपक्रमांना दिशा दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments