मायग्रेनचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना चांगल्याप्रकारे माहित आहे की, कामाचा दिवस चुकवून सिक लीव्ह घेणे काही त्यांच्यासाठी सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का, असे उत्पादकतेचे नुकसान होण्याचे प्रमुख कारण देखील आहे? हे विशेषत: २० ते ५० वर्ष वयोगटातील कामकरी व्यक्तींमध्ये दिसून येते, जेथे या वयोगटामध्ये सर्वाधिक काम केले जाते. यामागील कारणे विविध प्रकारची असू शकतात, जसे अनियमित वेळी काम किंवा मीटिंगचे आयोजन करणे, अधिक वेळ स्क्रिनवर व्यतित करणे, दीर्घकाळापर्यंत बसण्याची अयोग्य पद्धत आणि सतत तणाव येणे किंवा खूप थकवा येणे. पण अशा समस्यांची हाताळणी करण्यासाठी विविध उपाय आहेत.
मायग्रेनदरम्यान काय होते?
जागतिक स्तरावर मायग्रेनला डोकेदुखीपेक्षा अधिक मोठा आजार मानण्यात आला आहे. चारपैकी एका व्यक्तीला मायग्रेनचा त्रास आहे आणि भारतात जवळपास २५ टक्के व्यक्तींना मायग्रेनचा त्रास असल्याचा अंदाज आहे, जे जागतिक आकडेवारीच्या तुलनेत जास्त आहे. लॅन्सेटच्या (२०१९) मते, मायग्रेन हा जगभरात दुसरा सर्वात अक्षम करणारा न्यूरोलॉजिकल आजार आहे.
अनेक रूग्णांना आजीवन मायग्रेनचा त्रास होतो आणि त्याचे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. मायग्रेनदरम्यान मेंदू मेनिंजेस (मस्तिष्कावरण), त्याच्या आसपासच्या संरक्षक स्तरांना संकेत पाठवतो आणि प्रतिसादात, सीजीआरपी (कॅल्शिटोनिन जीन-रिलेटेड पेप्टाइड) सारखी रसायने उत्सर्जित होतात. सीजीआरपी विशिष्ट रिसीप्टर्सशी संलग्न होऊन मेनिंजेसमधील रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो आणि सूज येते.
रक्तवाहिन्यांमध्ये रसायनाचा प्रसार आणि सूजेमुळे मायग्रेनचा त्रास होतो. यानंतर मेंदूमध्ये वेदना जाणवू लागतात आणि त्या अधिक वाढत गेल्यास थकवा, प्रकाशाचा त्रास (फोटोफोबिया) व आवाजाचा त्रास (फोनोफोबिया) अशा लक्षणांचा त्रास होऊ लागतो. मेनिन्जियल रक्त वाहिन्यांमध्ये जळजळ व सूज मेंदूज्वर आजारामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणसारखी असतात. पण या केसमध्ये हे कोणत्या संसर्गामुळे होत नाही.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील एमडी, डीएम, डीएनबी, एफएएएन, एफआयएन कन्सल्टण्ट न्यूरोलॉजिस्ट आणि डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले, ”फक्त वेदनेपासून आराम किंवा एकदाच उपचार करण्यावर नाही तर मायग्रेनचे संपूर्ण निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वारंवार होणारा त्रास कमी करणे, त्रासाचा कालावधी कमी करणे आणि प्रभाव कमी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे व्यक्ती त्यांच्या जीवनाचा आनंद घेण्यासोबत कोणत्याही त्रासाशिवाय काम करू शकतात. मायग्रेपासून मुक्तता हेच अंतिम ध्येय आहे.”
कामावर मायग्रेनचा परिणाम
भारतात, मायग्रेनचा उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. रूग्ण दर महिन्याला सरासरी ५.९ कामाचे दिवस चुकवतात, ज्यामुळे वैयक्तिक त्रास होण्यासोबत आर्थिक परिणाम देखील होतो. जगभरातील लाखो व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्यासोबत त्यांचा जीवनाचा दर्जा कमी होत आहे. मायग्रेनच्या त्रासामुळे ते जीवनातील व कामामधील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये सामील होत नाहीत, शेवटच्या क्षणी प्लॅन रद्द करावे लागतात आणि मन नसताना देखील कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहावे लागते. भारतात प्रति व्यक्ती आर्थिक नुकसान दरवर्षाला ८,७३१ रूपये असण्याचा अंदाज आहे, म्हणजेच देशाचे आर्थिक नुकसान १८,६७४.३५ कोटी रूपये असेल.
कामावर उपस्थित असताना उत्पादनक्षम नसले तरी त्याचा फारसा विचार केला जात नाही, पण कामावर अनुपस्थितीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यास त्याचा खूप विचार केला जातो. शारीरिक वेदना होण्यासोबत मायग्रेनमुळे अवधान केंद्रित करणे कमी होते, काम करण्याची गती मंदावते. काही केसेसमध्ये व्यक्तींना त्यांच्या करिअरबाबत पुन्हा विचार करावा लागतो.
उत्पादनक्षम दिवस पुन्हा आणणे
मायग्रेनचा त्रास दूर करण्यासाठी सर्वांगीण उपचार आवश्यक आहे. रूग्णांनी प्रीस्क्राइब करण्यात आलेली औषधे वेळेवर घेतली पाहिजेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे, यामुळे दीर्घकाळापर्यंत आजाराचा त्रास कमी होण्यामध्ये मदत होते. उपचाराचा कालावधी, प्रतिकूल परिणाम आणि अनुपालन याबाबत डॉक्टर व न्यूरोलॉजिस्ट्ससोबत स्पष्टपणे सल्लामसलत केल्याने विश्वास वाढू शकतो आणि उपचारामध्ये येणारे अडथळे कमी होऊ शकतात.
डोकेदुखीचा सतत त्रास होत असेल तर मायग्रेनवरील औषधे घेतल्यास उपयुक्त ठरू शकते. जीवनशैलीमधील बदल जसे कामाच्या ठिकाणी काही वेळ विश्रांती, टप्प्याटप्प्याने पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि स्क्रिनवर व्यतित केल्या जाणाऱ्या वेळेचे व्यवस्थापन करणे आणि स्क्रिन ग्लेअर वापरणे यामुळे देखील वारंवार त्रास होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. डोकेदुखीमध्ये कारणीभूत घटकांकडे लक्ष दिल्यास त्वरित हस्तक्षेप करण्यामध्ये आणि त्रास वाढण्याला प्रतिबंध करण्यामध्ये मदत होऊ शकते.
इंटरनॅशनल हेडेक सोसायटीने वैद्यकीय थेरपी दृष्टिकोनामधून नवीन ध्येय स्थापित केले आहे, ते म्हणजे ‘मायग्रेनपासून मुक्तता’. फक्त वेदनेपासून आराम किंवा एकदाच उपचार करण्यावर नाही तर मायग्रेनचे संपूर्ण निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. व्यक्तींना त्यांचे सामान्य काम पुन्हा करण्यास, कामावर त्वरित परतण्यास आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. योग्य औघधोपचार, कारणीभूत घटकांना ओळखणे आणि जीवनशैलीमधील बदल यांसह हे ध्येय संपादित करता येऊ शकते आणि मायग्रेनला दूर ठेवत कामावर लक्ष केंद्रि
त करता येऊ शकते.


