मुंबई, 5 डिसेंबर 2025: भारतातील वेगाने वाढत असलेल्या ई-वेस्टच्या ताणाबाबत वाढत्या चिंता लक्षात घेऊन, गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अप्लायन्सेस व्यवसायाने आपल्या ‘India v/s E-Waste’ उपक्रमाचा विस्तार करत ‘द ई-वेस्ट दॅट वी ईट, बट शुडन्ट’ या जनजागृती मोहिमेची सुरुवात केली आहे. या उपक्रमातून एका कमी समजल्या जाणाऱ्या पण धोकादायक वास्तवावर प्रकाश टाकण्यात येत आहे. अयोग्य पद्धतीने हाताळलेला ई-वेस्ट जमिनीत आणि पाण्यात मिसळून शेवटी आपल्या अन्नसाखळीत कसा शिरतो, या प्रकाश टाकण्यात येत आहे. लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या प्रतिमा आणि त्यात मिसळलेल्या विषारी ई-वेस्ट घटकांच्या व्हिज्युअल रूपकांचा वापर करून, ब्रँडचे उद्दिष्ट जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीबाबत जागरूकता निर्माण करणे आहे—आणि यावेळी ही मोहीम थेट शालेय विद्यार्थ्यांपासून सुरू केली जात आहे.
प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (PIB) नुसार, भारतात ई-वेस्ट निर्मिती झपाट्याने वाढत असून वित्त वर्ष 24-25 मध्ये देशाने जवळपास 1.3 दशलक्ष मेट्रिक टन ई-वेस्ट निर्माण केले आहे. ही समस्या जागतिक स्तरावरही चिंताजनक आहे. यूएनच्या चौथ्या ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर (GEM) अहवालानुसार, जगभरात दरवर्षी ई-वेस्टमध्ये 2.6 दशलक्ष टन इतकी वाढ होत आहे आणि 2030 पर्यंत हा आकडा 82 दशलक्ष टनवर पोहोचण्याचा अंदाज आहे. फक्त 2022 या वर्षातच जगभरात विक्रमी 62 अब्ज किलो ई-वेस्ट निर्मिती झाली, आणि त्यापैकी केवळ 22.3% एवढेच ई-वेस्ट पर्यावरणपूरक पद्धतीने अधिकृतरीत्या संकलित व पुनर्वापरित झाले. अव्यवस्थित ई-वेस्टचे धोके फक्त फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ढिगांपुरते मर्यादित नाहीत. चुकीच्या पद्धतीने पुनर्वापरित केलेल्या उपकरणांतील विषारी घटक जमिनीत आणि भूजलात झिरपतात, आणि पुढे अन्नसाखळीत प्रवेश करून परिसंस्थेला, मानवाच्या आरोग्याला आणि भावी पिढ्यांना गंभीर धोके निर्माण करतात.
गेल्या काही वर्षांमध्ये गोदरेजने ‘India v/s E-Waste’ उपक्रमाच्या माध्यमातून अनेक नागरिक-केंद्रित कार्यक्रम राबवले आहेत. या मोहिमेद्वारे कंपनीने 1 लाख टनपेक्षा जास्त ई-वेस्ट संकलित करून पुनर्वापरित केले आहे आणि 5 लाखपेक्षा जास्त लोकांना जबाबदार ई-वेस्ट संकलन व विल्हेवाटीबाबत शिक्षित केले आहे. या वचनबद्धतेला पुढील पातळीवर नेत, ब्रँडने सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओंची मालिका प्रकाशित केली आहे—ज्यामध्ये लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या प्रतिमांमध्ये विषारी ई-वेस्ट घटकांचे व्हिज्युअल रूपक दाखवले आहे. उद्दिष्ट एकच: लोकांना या धोक्याची जाणीव करून देणे आणि ई-वेस्ट जबाबदारीने कसा टाकावा याबद्दलचा मार्गदर्शक डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे. ब्रँड देशभरातील 200+ शाळांमध्ये जनजागृती कार्यशाळाही आयोजित करत आहे आणि लाइफ-साइज्ड ‘E-waste Table’ इंस्टॉलेशन्स प्रदर्शित करत आहे. हे इंस्टॉलेशन फेकून दिलेल्या अप्लायन्स घटकांपासून तयार केलेले असून, त्यासोबतच ‘Toxic Tacos’, ‘Circuit Board Cake’ यांसारखी कल्पक पण प्रभावी 3D मॉडेल्स देखील प्रदर्शित केली जात आहेत. या दृश्यांमुळे विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने समजते की घरगुती उपकरणे, गॅजेट्स आणि अगदी इलेक्ट्रॉनिक खेळणी—जे निष्काळजीपणे फेकून दिले जातात—ती विषारी स्वरूपात पुन्हा आपल्या शरीरात कशी परत येऊ शकतात.
उपक्रमाबद्दल बोलताना, कमल नंदी, बिझनेस हेड आणि EVP, गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या अप्लायन्सेस व्यवसाय, यांनी सांगितले, “आपल्या लोकांसाठी, देशासाठी आणि ग्रहासाठी प्रगतीचा मार्ग दाखवणे ही आमच्या ब्रँडची पायाभूत मूल्ये आहेत. या दृश्यदृष्ट्या प्रभावी ई-वेस्ट जनजागृती मोहिमेद्वारे आमचा उद्देश नागरिकांनी त्यांच्या ई-वेस्ट फुटप्रिंटचा पुनर्विचार करावा, आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीकडे वळावे, हा आहे.”
याबद्दल पुढे बोलताना, स्वाती राठी, हेड – मार्केटिंग, अप्लायन्सेस बिझनेस, गोदरेज एंटरप्रायझेस समूह, म्हणाल्या, “आजची तरुण पिढी डिजिटल नेटिव्ह म्हणून वाढत आहे—ज्यांच्या आजूबाजूला अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि गॅजेट्स असतात. त्यामुळे ई-वेस्टचा ताण पुढील काळात आणखी वाढणार हे स्पष्ट आहे. पर्यावरण संवर्धन हे आमच्या मुख्य मूल्यांपैकी एक असल्याने, आम्ही इच्छितो की ई-वेस्ट विल्हेवाटीच्या बाबतीत आमची तरुण पिढी योग्य सवयींनी सुरुवात करावी. ही जनजागृती मोहीम अन्नाच्या भाषेतून तरुण भारताशी संवाद साधते—प्रभावी दृश्य रूपकांचा वापर करून ई-वेस्टचा त्यांच्या स्वतःच्या आरोग्याशी आणि कल्याणाशी संबंध जोडते—आणि जबाबदार ई-वेस्ट विल्हेवाटीबाबत अधिक सजग होण्यासाठी त्यांना प्रेरित करते.”
ब्रँडने आपल्या ई-वेस्ट भागीदार हुल्लाडेकसोबत राबवलेल्या पॅन-इंडिया स्कूल अॅक्टिवेशन्स या उपक्रमाला सोशल मीडिया अॅम्प्लिफा आणि डिजिटल व्हिडिओ प्रमोशनचे सहाय्य मिळत आहे—जे या समस्येची तातडी स्पष्ट करते आणि प्रभावी स्टोरीटेलिंगद्वारे संदेश अधिक ठळकपणे पोहोचवते. या संकल्पनेची मांडणी आणि अंमलबजावणी Adfactors PR आणि Tribes Communication यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.


