Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात २०२६ मध्ये नवीन गाड्यांच्या आगमनाची निसानकडून घोषणा, ७ सीटर बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइट...

भारतात २०२६ मध्ये नवीन गाड्यांच्या आगमनाची निसानकडून घोषणा, ७ सीटर बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइट येणार 

 

 

• निसानच्या पुनरुत्थानाची एक नवीन यशोगाथा: ग्रॅव्हाइट निसानच्या उत्पादन धोरणातील एक मोठे पाऊल असून आगामी मॉडेल्सच्या धाडसी नवीन श्रेणीत ती सहभागी होईल.

• भारतीय कुटुंबांसाठी डिझाइन केलेली: १.४ अब्ज भारतीयांकडून प्रेरित होऊन, भारतीय कुटुंबांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली वैविध्यपूर्ण ७-सीटर बी-एमपीव्ही.

• जागतिक ओळख: निसानची खास सी-आकाराची फ्रंट फॅसिया ग्रिलची वैशिष्ट्ये रस्त्यावर उपस्थितीची जाणीव करून देते आणि ब्रँडची ओळख पटवून देते.

• निसान मोटर इंडियासाठी एक नवीन अध्याय: २०२६ च्या सुरुवातीला भव्य पदार्पणासाठी सज्ज असलेल्या ऑल-न्यू ग्रॅव्हाइटचे स्थानिक पातळीवर रेनॉल्टच्या चेन्नई सुविधेत उत्पादन केले जाईल.

• नेटवर्कचा विस्तार: टियर I आणि टियर II शहरांमध्ये निसान डीलर नेटवर्क विस्तार सुरू आहे.

 

गुरूग्राम, १८ डिसेंबर २०२५: निसानची नवीन गेम-चेंजिंग सात-सीटर बी-एमपीव्ही ग्रॅव्हाइट या नावाने २०२६ च्या सुरुवातीला बाजारात उपलब्ध होईल. ब्रँडच्या भारतासाठी नवीन आणि धोरणात्मकरित्या तयार केलेल्या उत्पादन श्रेणीअंतर्गत आणले जाणारे हे पहिलेच उत्पादन आहे.

 

आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी उद्देशाने बनवलेली ग्रॅव्हाइट अपवादात्मक अद्वितीय प्रतिभा आणि बदल करता येण्याची क्षमता देते. ती किमतीबाबत जागरूक कुटुंबांसाठी सोयीची नव्याने व्याख्या करते आणि निसानच्या पुनरुज्जीवित उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्ताराला गती देते.

 

जुलै २०२४ मध्ये निसान मोटर इंडियाच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन मोहिमेतील दुसरे मॉडेल म्हणून घोषित केलेली ग्रॅव्हाइट कंपनीचा पुढील वेग अधोरेखित करते. उत्पादनाच्या पुढील क्षेणीत २०२६ च्या सुरुवातीला ग्रॅव्हाइट बाजारात उपलब्ध होईल; त्यानंतर २०२६ च्या मध्यावर टेक्टॉन आणि २०२७ च्या सुरुवातीला ७-सीटर सी-एसयूव्ही आणण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यातून भारतीय ग्राहकांसाठी आपल्या ऑफरमध्ये वैविध्यपूर्णता आणणे, त्या बळकट करून पुनरुज्जीवित करण्यासाठी निसानच्या खोल आणि सतत वचनबद्धतेची खात्री दिली जाईल.

 

निसानची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करणारे नाव

“ग्रॅव्हाइट” हे नाव गुरुत्वाकर्षण या शब्दापासून आलेले आहे. त्याचा अर्थ संतुलन, अंतर्गत स्थैर्य आणि शक्तिशाली आकर्षण हा आहे. ही निवड कुटुंबांना आराम, उत्कृष्ट प्रतिभा आणि अखंड कनेक्टिव्हिटीमध्ये परिपूर्णपणे जोडणारी वाहने डिझाइन करण्याच्या निसानचा मुख्य दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. १.४ अब्ज भारतीय आणि राष्ट्राचा पाया बनवणाऱ्या १९,००० स्थानिक भाषा आणि परंपरांपासून प्रेरित होऊन ग्रॅव्हाइट हा आकांक्षी भारतीयांसाठी परिपूर्ण साथीदार आहे.

 

आंतर्रचना: बदल करण्याची क्षमता आणि आरामदायीपणा

ग्रॅव्हाइटमध्ये अपवादात्मक केबिनमध्ये भरपूर जागा आणि अग्रगण्य, सामान ठेवण्यासाठीच्या नवकल्पनांसह कौटुंबिक प्रवासाचे रूप पालटण्याची क्षमता आहे. वैविध्यपूर्ण प्रतिभा आणि अंतर्ज्ञानी वापरासाठी प्रत्येक पैलू काळजीपूर्वक तयार केला गेला आहे – अल्ट्रा-मॉड्यूलर सीटिंग सहजपणे बदलत्या प्रवासी आणि कार्गो गरजांशी जुळवून घेतात, स्मार्ट जागेचा वापर दैनंदिन प्रवास आणि विस्तारित कुटुंब रोड ट्रिप दोन्ही तितकेच अखंड बनवतो.

 

२०२६ च्या सुरुवातीला आपल्या भव्य पदार्पणासाठी सज्ज असलेल्या ऑल-न्यू ग्रॅव्हाइटचे उत्पादन चेन्नईमध्ये स्थानिक पातळीवर केले जाईल. या उत्पादन टप्प्यामुळे निसान मोटर इंडियाची भारतीय ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार विशेषतः तयार केलेली वाहने वितरित करण्याच्या अढळ वचनबद्धतेला बळकटी मिळते. निसानच्या नवीन उत्पादनांमधील दुसरे महत्त्वाचे मॉडेल असलेली ग्रॅव्हाइट हे भारतातील ब्रँडच्या उत्पादन श्रेणीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

रचना आणि प्रेरणा

ऑल-न्यू ग्रॅव्हाइट निसानच्या जागतिक डिझाइन भाषेशी जुळणारी एक ठळक आणि वेगळी ओळख प्रस्थापित करते. निसानच्या डीएनएचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याची सिग्नेचर सी-आकाराची फ्रंट ग्रिल – त्वरित ओळख आणि रस्त्यावरील ठळक उपस्थितीची खात्री करते. ग्रॅव्हाइटची आकर्षक प्रमाणबद्धता आणि आत्मविश्वासपूर्ण असलेला गाडीचा आकार आधुनिक अभिजाततेला व्यावहारिक आणि दैनंदिन वापराच्या गरजेशी जोडतो.

ग्रॅव्हाइट हे त्याच्या श्रेणीतील एकमेव वाहन आहे ज्यात विशिष्ट हूड ब्रँडिंगसह अद्वितीय रीअर-डोअर बॅजिंग आहे – एक धाडसी डिझाइन निवड जी त्याची विशिष्ट ओळख वाढवते. मागील बाजू निसानच्या सिग्नेचर सी-आकाराच्या इंटरलॉक थीमचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर एमपीव्ही निर्विवादपणे वर्चस्व गाजवेल.

निसान एएमआयईओ (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया) चे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना म्हणाले की: “भारताने कायमच एएमआयईओच्या कामगिरीत एक उत्तम योगदान दिले आहे आणि निसान मोटर इंडिया आमच्या धोरणात महत्त्वाची भूमिका बजावते. आर्थिक वर्ष २५ मध्ये आम्ही आमचे व्यवसायिक कामकाज मजबूत केले आहेत, आमची उत्पादनश्रेणी वाढवली आहे आणि आमच्या २०२४ च्या उत्पादन मोहिमेअंतर्गत दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आहे. जागतिक ज्ञानातून साकारलेली आणि भारतीय ग्राहकांच्या गरजांशी जुळणारी आगामी उत्पादन श्रेणी या गतिमान बाजारपेठेतील आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. भारतात आणि भारतासाठी विकसित होणारी नवीन मॉडेल्स आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीमुळे भारत निसान सहयोगासाठी वाढीचा प्रेरक आणि धोरणात्मक केंद्र दोन्ही ठरला आहे. ग्रॅव्हाइटचे उद्घाटन आमची सातत्यपूर्ण गती दर्शवते आणि पुढील वाटचालीवरील आमचा विश्वास मजबूत करते.”

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले: “ऑल-न्यू ग्रॅव्हाइट हा निसान मोटर इंडियाच्या विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचा पुरावा आहे. देशाच्या रचनेत खोलवर रुजलेली ही गाडी आमच्या ग्राहकांच्या विविध गरजांसाठी परिपूर्ण साथीदार बनण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आमच्या नवीन उत्पादन श्रेणीतील दुसरे मॉडेल म्हणून ग्रॅव्हाइट आमच्या परिवर्तनाच्या प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल असून भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी वाहने देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

या वाढीला पाठिंबा देण्यासाठी निसान आपल्या देशव्यापी डीलरशिप नेटवर्कचा विस्तार वेगाने करत आहे. त्यामुळे देशभरात गाडी खरेदी करणे अधिक सुलभ होईल आणि ग्राहकांचा अनुभव समृद्ध होईल.

 

या गतीवर आधारित निसान मॅग्नाइट ब्रँड जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी ‘मेड इन इंडिया’ मॉडेलपैकी एक म्हणून ठसा उमटवत आहे. आता ही गाडी दक्षिण आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील ६५ बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते. मॅग्नाइटला लोकांनी पसंती दाखवल्यामुळे निसानसाठी उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे.

 

भारतात भविष्यासाठी तयार असलेल्या उत्पादन साखळीला आणखी बळकटी देताना निसानने ऑक्टोबर २०२५ मध्ये टेक्टॉन या आपल्या आगामी प्रीमियम एसयूव्हीचे उद्घाटन केले. तिचे आकर्षक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानासह, टेक्टॉन ब्रँडच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना देते. ती आजच्या नवीन ग्रॅव्हाइटच्या उद्घाटनाला पूरक आहे आणि भारतीय बाजारपेठेसाठी तयार केलेल्या मजबूत, विविध श्रेणीतील उत्पादनांची ओळख पटवते.

गाडीची वैशिष्ट्ये आणि किंमतींसह अधिक तपशील भविष्यात घोषित केले जातील.

अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या. www.nissan.in

FOR FURTHER MEDIA QUERIES PLEASE CONTACT:

Kanika Sood

Nissan Motor India Pvt. Ltd.

Email: media.comms@email.nissan.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments