Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉक्लिआ पुणे संस्थेकडून लहान मुलांसाठी मोफत श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन

कॉक्लिआ पुणे संस्थेकडून लहान मुलांसाठी मोफत श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन

कॉक्लिआ पुणे हिअरिंग अ‍ॅण्ड स्पीच संचलित स्वरनाद कर्णबधिर बालकांचे पुनर्वसन केंद्र तर्फे ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक ३ / ३ / २०२४ रोजी स्वरनाद कर्णबधिर बालकांचे पुनर्वसन केंद्र, कोथरूड, पुणे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहे. या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घेण्यासाठी 9890738817 / 8483945521 / 9689836062 या क्रमांकावर संपर्क करा.

बालकाच्या वाचा आणि भाषा विकासासाठी 6 वर्षापर्यंतचा काळ हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या शिबिरात कानाची योग्य तपासणी, समुपदेशन, कर्णबधिर बालकाचे शिक्षण व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. कर्णबधिरत्वाचे लवकर व योग्य निदान न झाल्यास ऐकण्याच्या क्षमतेचा विकास होणे कठिण असू शकते. तसेच बालकाचा वाचा भाषा विकास आणि संवादकौशल्य पुरेसे विकसित होणार नाही,परिणामी शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात.

शिबिरातील मार्गदर्शनामुळे कर्णबधिर बालकाला बोलण्याची व सर्व साधारण मुलांच्या शाळेत जाण्याची संधी मिळू शकणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments